पारंपरिक उत्साहात गणेश जयंती

Ganesh Jayanti in the traditional spirit
Ganesh Jayanti in the traditional spirit

कोल्हापूर : "गजानना श्री गणराया...', "बाप्पा मोरया रे...', अशा भाव-भक्तीगीतांच्या माहौलात आज शहर आणि परिसरात गणेश जयंती सोहळा सजला. दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी सर्वत्र गणेश जन्मकाळ झाला. पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी झाले. जन्मकाळ सोहळ्यानंतर सवाद्य पालखी मिरवणुका निघाल्या. सायंकाळनंतर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी एलईडी स्क्रीनवरून मंदिरातील विविध कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण झाले. 

दरम्यान, सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसादाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. उद्या (बुधवारी) बहुतांश ठिकाणी महाप्रसादांचे आयोजन केले आहे. सोशल मीडियावरही गणेश जयंतीची धूम राहिली. अनेकांच्या व्हॉटस्‌ ऍप डीपीवर श्री गणरायाची विविध रूपे झळकली तर नव्या-जुन्या गाण्यांचे व्हिडिओही शेअर झाले. 
ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रांग लागली होती. स्वयंभू गणेश मंदिर, पितळी गणपती, जाऊळाचा बालगणेश, चंबुखडी, आर.के. नगर, अंबाबाई मंदिराच्या आवारातील गारेचा सिध्दीविनायक मंदिर आदी ठिकाणीही पहाटेपासून विविध कार्यक्रम झाले. रंकाळा चौपाटी, गजानन महाराजनगरातील श्री एकदंत गणेश मंडळ, शाहूपुरीतील पंचमुखी गणेश मंदिरासह शिवाजी चौक तरूण मंडळातर्फेही सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. शिवाजी चौकात दुपारी जन्मकाळ सोहळा, त्यानंतर पालखी मिरवणूक झाली. सायंकाळी रक्तदान शिबिर आणि स्नेहमेळावा झाला. 


अंबाबाई मंदिरातील श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव झाला. जाधववाडी येथील मंदिरात महाप्रसाद वाटप करण्यात आले. 

राजस्थानी समाजाला मान 
शुक्रवार पेठेतील न्यू शिवनेरी तरूण मंडळातर्फे शिवगणेश मंदिरात गणेश जयंती सप्ताहाचे आयोजन केले आहे. आज जन्मकाळ सोहळा आणि रात्री पालखी मिरवणूक झाली. आरतीचा मान यंदा मंडळाने राजस्थानी समाजबांधवांना दिला. त्याशिवाय मंडळाच्या सत्तरहून अधिक कार्यकर्त्यांनी राजस्थानी वेशभूषेत मिरवणूकीत सहभाग घेतला. पालखी मिरवणूकीच्या निमित्ताने शुक्रवार पेठ परिसर रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्यांनी सजून गेला. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी मिरवणूकीला प्रारंभ झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com