कचरा कोंडाळा ओव्हफ्लो, कुत्र्यांच्या वावराने धास्ती 

Garbage pile overflow, frightened by dogs
Garbage pile overflow, frightened by dogs

कोल्हापूर : कळंबा आपटेनगर रिंगरोडवरील कचरा कोंडाळयात कचऱ्याचे ढिग भटक्‍या कुत्र्यांना आमंत्रण देत आहेत. याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. कळंबा-आपटेनगर रिंगरोडवरचा परिसर अनेक छोट्या मोठ्या कॉलन्यांनी व्यापला आहे. रिंगरोडचेही रुंदीकरण तसेच डांबरीकरण झाले आहे. तशी या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे कचरा कोंडाळे कमी पडू लागले आहेत. 

या भागातील लोकवस्ती वाढत आहे. ओढ्याजवळील रस्त्याकडेलाच कचरा कोंडाळा आहे. भागातील कचरा या कोंडाळ्यात टाकण्यात येतो. आसपासच्या वस्तीचा विचार करता या कोंडाळ्यावर मर्यादा येत आहेत. हा कोंडाळा सायंकाळपर्यंत कचऱ्याने पूर्ण भरून ओव्हर फ्लो होत असतो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते तसेच कचऱ्याच्या ढिगामध्ये भटक्‍या कुत्र्यांच्या झुंडी दिसू लागतात. ही कुत्री नागरिकांच्या अंगावर येण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. 

या ठिकाणाहून जाताना वाहन चालकांच्या अंगावरही कुत्री धावून जातात. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे कधी सुरू तर कधी बंद असतात. त्यामुळे अंधारातून जाताना कुत्र्यांच्या झुंडी कधी अंगावर येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. प्रशासनाने लक्ष देऊन परिसरात कचरा कुडींची संख्या वाढवणे गरजेचे बनले आहे. त्याचबरोबर कचऱ्याचा उठावही नियमित केल्यास भटक्‍या कुत्र्यांचाही वावर कमी होईल. 

दृष्टिक्षेप 
- कचरा कुंडीत कचऱ्याचे ढिग भटक्‍या कुत्र्यांना आमंत्रण 
- दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास 
- वाढत्या वस्त्यांमुळे आणखी कचरा कुंडी गरजेच्या 
- अंधारातून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com