Photo : सागर वेळीच कुटुंबाला बाहेर घेऊन गेला म्हणून बरं नाहीतर....

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास स्वयंपाक घरात गॅस चा वास येऊ लागल्याने सागर ने सर्वांना घराबाहेर आणले तोच घरात स्फोट झाला.

घुणकी (कोल्हापूर) : चावरे (ता.हातकणंगले)येथील पोपट आनंदराव घोडके यांच्या राहत्या घरी स्वयंपाक घरात गॅस च्या स्फोटात फ्रिज सह प्रापंचिक वस्तू जळून खाक झाल्या. तर या स्फोटात तीन खोल्यावरील पत्र्याचे व कौल्याचे घट उडून गेल्याने सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना सकाळी साडेआठ च्या सुमारास घडली.

 घरावरील उडालेली पत्रे

घटना स्थळा वरून मिळालेली माहिती अशी

नवे चावरे येथे पोपट आनंदराव घोडक(वय 60)यांचे मोहिते गल्ली येथे घर आहे.त्यांच्या समवेत रंजना पोपट घोडके,सागर पोपट घोडके,प्रियांका सागर घोडके,प्राणिश सागर घोडके(वय सव्वा वर्ष)हे कुठुबिय राहते.आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास स्वयंपाक घरात गॅस चा वास येऊ लागल्याने सागर ने सर्वांना घराबाहेर आणले तोच घरात स्फोट झाला. यामध्ये स्वयंपाक घरातील फ्रिज प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले.या स्फोटात स्वयंपाक घर व अन्य दोन खोल्यांच्या वरील पत्रे व कवले उडून गेली.

स्फोटामुळे घरात पत्रे व कवले उडून पडली

स्फोटामुळे घरातील अन्य भिंतींना तडे गेले खिडक्यांच्या काचा फुटल्या.स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकही भयभीत झाले. त्यांनी पोपट घोडके यांच्या घराकडे धाव घेतली त्यातील काही युवकांनी प्रसंगावधान राखून दोन कुपनलिकांच्या नळाच्या पाण्याने आग विझवली.सिलेंडर,शेगडी,फ्रिज,घराबाहेर आणला,घरातील सर्व साहित्य बाहेर आणल्याने पुढील अनर्थ टळाला अन्यथा शेजारच्या घरांना आग लागली असती त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान वारणांनागर येथील भारत गॅस एजंशी चे कर्मचाऱयांनी भेट देऊन पाहणी केली.स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gas explosion in chavre kolhapur marathi news