रोडरोमिओच्या त्रासातून मुलीने केले विषप्राशन?

girl was poisoned crime case ring road kolhapur
girl was poisoned crime case ring road kolhapur

कोल्हापूर: रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवीयन मुलीने विषप्राशन केल्याची चर्चा रिंगरोड परिसरात दिवसभर सुरू होती. मुलीला त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याचेही काही जणांनी सांगितले; मात्र या चर्चेला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या चर्चेच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


रिंगरोड परिसरातील अल्पवयीन मुलीने चार दिवसांपूर्वी विषप्राशन केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला एकाने त्रास दिला होता. त्यातूनच तिने हे पाऊल उचलले. तसे अज्ञातांनी त्या व्यक्तीच्या बांधकामावर हल्ला करून गोंधळ माजवला. तसा तो गायब झाला, अशी चर्चा आज होती. 

चर्चेच्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी सुरू केली; पण अद्याप तक्रार देण्यासाठी पुढे कोणी आले नाही. मुलीची प्रकृती सुधारत आहे. तिचा जबाब घेतल्यानंतर नेमके सत्य पुढे येईल. त्यानुसार योग्यती कारवाई केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com