बापरे....सोने 50 हजार, चांदी 48 हजारांवर 

gold 50 thousand, silver 48 thousand
gold 50 thousand, silver 48 thousand

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेतल्या अस्थिरतेमुळे सोन्याच्या दराने प्रति दहा ग्रॅम 50 हजार रूपयांवर आज उसळी घेतली. चांदीचा दरही प्रतिकिलो 48 हजार 360 रूपयांवर पोचला. सोन्याच्या वाढत्या दराने ग्राहकांची बाजारपेठेतील रेलचेल संथ असून, "वेट अँड वॉच'च्या भूमिकेत ते आहेत. 

आंतरराष्ट्रीय युद्धसदृश्‍य स्थिती, सोने उत्पादनातील खर्चात झालेली वाढ, सोन्याचा डॉलरमध्ये वाढलेला दर व सुरक्षेचा पर्याय म्हणून विविध राष्ट्रांची सोन्यात वाढलेल्या गुंतवणुकीचा परिणाम म्हणून सोने दरात वाढ होत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 

विमान सेवा बंद असल्याने सोन्याची आवकही थांबली आहे. मुंबईतून कोल्हापुरातल्या बाजारपेठेत सोन्याची आवक बंद असल्याने सोने बाजारातच फिरत आहे. मुंबई मार्केट जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत भाववाढ अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर 1 जुलै ते नोव्हेंबर दरम्यान विवाह मुहूर्त नसले तरी गरजेनुसार सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. सोन्या-चांदीच्या दरावर त्यांचे बारकाईने लक्ष असून, दराची चौकशी त्यांच्याकडून दररोज सुरू आहे. वायदा बाजारात सोन्यावर होत असलेली गुंतवणूक दर वाढीवर परिणाम करत आहे. 

जगभरातील आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. प्रत्येक देश सुरक्षिततेसाठी सोन्याच्या गुंतवणुकीत आहे. सोने उत्पादनाच्या खर्चात झालेली वाढ सोने दरातील वाढीस कारणीभूत ठरली आहे. 
- भरत ओसवाल, सराफ व्यावसायिक. 

सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर 25 जूनला 48 हजार 600 रूपये होता. भारत व चीन यांच्यातील तणावाचे संबंधामुळे सोन्यात गुंतवणूक होत आहे. परिणामी सोने दरात वाढ होत आहे. सोन्याची आवक थांबल्याने दरातील वाढ सुरूच आहे. सोन्याचा दर जरी 48 हजार 600 रूपयांवर असला तरी तो जीएसटीमुळे 50 हजारांवर पोचला आहे. 
- अमोल ढणाल, सराफ व्यावसायिक. 

दृष्टिक्षेप 
- आंतरराष्ट्रीय युद्धसदृश्‍य स्थितीची परिणाम 
- विमान सेवा बंदमुळे सोन्याची आवक थांबली 
- आवक बंदमुळे सोने बाजारातच फिरतेय 
- वायदेबाजारात सोन्यावरील गुंतवणुक दरवाढीवर करतेय परिणाम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com