सुवर्णकाळात कबड्डीपटूंची पुरस्कारांवर मोहोर 

संदीप खांडेकर
शुक्रवार, 13 मार्च 2020

कोल्हापूर : कबड्डीच्या सुवर्णकाळात जिल्ह्यातील संघांचा दरारा वाढत असताना नव्या संघांची भर पडत गेली. छावा क्रीडा मंडळ (शिरोल्‌ पुलाची), डायनॅमिक स्पोर्टस क्‍लब (इचलकरंजी), हेर्ले क्रीडा मंडळ, शिवशाहू क्रीडा मंडळ (सडोली खालसा), राणा प्रताप (कोल्हापूर), राष्ट्रसेवक क्रीडा मंडळाने (तळसंदे) कबड्डीत चमक दाखवली. राष्ट्रीय स्तरावर 12 खेळाडूंनी मजल मारली.

कोल्हापूर : कबड्डीच्या सुवर्णकाळात जिल्ह्यातील संघांचा दरारा वाढत असताना नव्या संघांची भर पडत गेली. छावा क्रीडा मंडळ (शिरोल्‌ पुलाची), डायनॅमिक स्पोर्टस क्‍लब (इचलकरंजी), हेर्ले क्रीडा मंडळ, शिवशाहू क्रीडा मंडळ (सडोली खालसा), राणा प्रताप (कोल्हापूर), राष्ट्रसेवक क्रीडा मंडळाने (तळसंदे) कबड्डीत चमक दाखवली. राष्ट्रीय स्तरावर 12 खेळाडूंनी मजल मारली.

राजू माने पहिले राष्ट्रीय खेळाडू झाले. ते दोन वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळले. विक्रम पाटील, तुषार पाटील तीन, नवनाथ जाधव, सागर खटाळे दोन, तर प्रकाश पाटील, देवेंद्र बिरनाळे, आनंद पाटील यांनी एकदा राष्ट्रीय स्तराववर कौशल्य दाखवले. 

पुरुष वरिष्ठ गट राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघ चार वेळा अंतिम फेरीत पोचला. पैकी दोन वेळा संघाने विजेतेपदावर मोहोर उमटवली. डॉ. रमेश भेंडिगिरी यांनी 1991 ते 99 पर्यंत प्रशिक्षक पदाची सूत्रे आपल्याकडे ठेवून सर्व गटातील मुले-मुलींच्या संघांना मार्गदर्शन केले. सब ज्युनिअर व ज्युनिअर स्पर्धांत कोल्हापूर जिल्हा संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

महिलांच्या संघाने राष्ट्रीय स्तरावर सात वेळा अंतिम फेरी गाठली. सहा वर्षे राज्य निवड अजिंक्‍यपद चाचणीत कोल्हापूरचा दबदबा राहिला. डॉ. भेंडिगिरी यांच्या प्रशिक्षकपदाची दखल राज्य शासनाने घेत त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्काराने सन्मानित केले. प्रा. संभाजी पाटील यांनी 1991 नंतर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कामकाजात बारकाईने लक्ष घातले. सडोलीचे मानसिंग पाटील 1993-94 ला संघाचे कर्णधार होते. त्यांनी 1995 ला शाहू क्रीडा मंडळाची स्थापना केली. ते शिवशाहू क्रीडा मंडळातून खेळत होते. 

माधवराव सानप व प्रा. संभाजी पाटील यांच्या कबड्डी खेळातील योगदानाची दखल राज्य शासनाने घेऊन दोघांना क्रीडा संघटकांसाठीच्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरव केला. मात्र, एकाही कबड्डीपटूला खेळाडू म्हणून शिवछत्रपती पुरस्कार मिळाला नाही. याउलट तीन महिलांनी 1994 ते 97 दरम्यान शिवछत्रपती पुरस्कार मिळवला. उमा भोसले- भेंडिगिरी (1994-95), मुक्ता चौगुले (1995-96), अनुराधा भोसले (1997-98) यांची नावे या यादीत आहेत. पुरुषांनी कबड्डीचे मैदान गाजवून राष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून जबाबदारी सक्षमपणे पेलली. ही जमेची बाजू असली तरी वरिष्ठ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराचा खेळाडू फज्जा गाठत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. 

जिल्ह्यातील राष्ट्रीय पंच असे : 
अजित पाटील (किणी), शहाजहान शेख, प्रा.आण्णासाहेब गावडे (शिरोळ), बाबासाहेब उलपे (कोल्हापूर), रुपेश जाधव, बाळकृष्ण ढवळे व शंकर पवार (इचलकरंजी), आशिष मगदूम (कुरुंदवाड), भगवान पवार (कोडोली), प्रदीप बनगे (जांभळी), प्रा. चंद्रशेखर शहा, उदय चव्हाण. (इचलकरंजी), कुबेर पाटील, विजय खराडे व सुरेश खराडे (शिंदेवाडी), प्रकाश मोहिते, आब्बास पाथरवट, आप्पा पाटील व शरद तावदारे (कुरुंदवाड), प्रकाश कळंत्रे (अर्जुनवाड), संगिता फास्के (एकोंडी), जयश्री खडके व अलका पाटील (कसबा तारळे), कमरुद्दीन देसाई व युवराज गावडे (शिरोली), प्रा.आण्णा पाटील (वारणा), दिलीप चव्हाण (तळसंदे), प्रा. शिवाजीराव चोरगे (गारगोटी), चंद्रकांत गावडे (शिरोळ), रघुनाथ पाटील, बाळासाहेब पाटील (वडणगे) 
 

प्रो कबड्डीत जिल्ह्यातील खेळाडू 
सागर खटाळे, तुषार पाटील, आनंद पाटील, ऋतुराज कोरवी, महेश मगदूम, प्रतिक पाटील, सौरभ पाटील, विश्वनाथ मोरे, बाजीराव शेडगे खेळाडू खेळले आहेत. अक्षय जाधव, सूरज देसाई व सिद्धार्थ देसाई जन्माने कोल्हापूरकर असले तरी ते पुण्यातील सतेज क्रीडा मंडळातून ख्‌ेळतात. ते पुणेकर म्हणूनच प्रो कबड्डीत खेळले. या ख्‌ेळाडूंनी कोल्हापूर जिल्ह्याकडून खेळावे, यासाठी जिल्हा कबड्डी असोसिएशन काय करणार, हे गुलदस्त्यात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goldsmiths confer on award for kabaddi players