पन्हाळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींची  १८ टेबलावर ९ फेऱ्यांत होणार मतमोजणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

सकाळी ८ वाजता १८ टेबलांवर मतमोजणीला सुरवात होणार

आपटी - पन्हाळा तालुक्यात ३९ ग्राम पंचायतींच्या मतमोजणीचे नियोजन पूर्ण झाले असून मयूर उद्यान येथील नगरपरिषद हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजता १८ टेबलांवर मतमोजणीला सुरवात होणार असून ९ फेऱ्यात  मतमोजणी पूर्ण होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिली.

 सोमवारी (ता.१८) होणाऱ्या मतमोजणीसाठी ५४ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून प्रत्येक टेबलला तीन कर्मचारी कार्यरत असतील. यावेळी होणाऱ्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आपटी, नेबापूर, देवाळे, नावली, जेऊर, इंजोळे या गावाची मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीत बुधवारपेठ, पैजारवाडी, आवळी,  धबधबेवाडी, जाफळे, पोखले या गावांची मतमोजणी होईल. तीसऱ्या फेरीत मोहरे, आरळे, कसबा सातवे, हरपवडे या गावाची मतमोजणी होणार आहे. चौथ्या फेरीत तिरपण, कळे, पुनाळ, सातार्डे या गावांची मतमोजणी होणार आहे. पाचव्या फेरीत वाघवे/ गुडे, पोर्ले तर्फ ठाणे, उंड्री या गावांची मतमोजणी होईल. सहाव्या फेरीत सावर्डेतर्फ सातवे, केखले, नणुंद्रे, निवडे, पुशिरे तर्फ बोरगाव, निकमवाडी या गावाची मतमोजणी होईल. तर सातव्या फेरीत तेलवे, म्हाळुंगे तर्फ बोरगाव, पोंबरे, पोहाळे तर्फ बोरगाव, वारनुळ, कणेरी या गावांची मतमोजणी होणार आहे.  आठव्या फेरीत दिगवडे, पोहाळवाडी, माजनाळ, कोडोली येथील मत मोजणी होणार असून नव्या फेरीत कोडोली ग्रामपंचायतीच्या उर्वरित प्रभागांची मोजणी होणार आहे.

हे पण वाचा भावा ! उगच हॉर्न कशाला वाजवतोस 

 सर्वात कमी जागांच्यासाठी निवडणूक

पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथे एका प्रभागातील २ जागा, पोहाळवाडी येथे एका प्रभागातील २ जागा तर हरपवडे येथे फक्त १ जागेसाठी निवडणुक लागली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election 2021 kolhapur panhala