...अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू दिव्यांग बांधवांचा इशारा   

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांचा आपल्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू आहे

इचलकरंजी : सोमवारी शहरात दिव्यांगाच्या मोर्चाने लक्ष वेधून घेतले. कोणी तीनचाकी सायकलवरून, कुणी दुचाकीवरून, कुणी कुबड्या घेऊन, अंध लोक घरातील नातेवाईकाचा हात धरून अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रलंबीत मागण्या तात्काळ मार्गी लावून आम्हा दिव्यांग बांधवाना आधार द्यावा अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिव्यांग बांधवांनी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिला. 

गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांचा आपल्या मागण्यांसाठी संघर्ष सुरू आहे. शासन सवलत जाहीर करते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही आणि दिव्यांग बांधव यापासून दूर राहतात. अशा सर्व प्रलंबीत मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी सोमवारी मोर्चा काढला. गांधी पुतळा चौकातून मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. त्यानंतर मागणीचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देऊन सविस्तर चर्चा केली.

दिव्यांगाना वाहने घेण्यासाठी सवलत मिळावी, थकीत अनुदान मिळावे, नोकरीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी, एस. टी. महामंडळात स्वखर्चाने स्मार्टकार्ड मिळावे यासह विविध मागण्यांबाबत प्रांताधिकाऱ्यांशी दिव्यांग बांधवांनी चर्चा केली. तसेच नगरपालिकेने जाहीर केलेले 5 टक्के दिव्यांग अनुदान तात्काळ खात्यावर जमा करावे अशी विनंती केली.

हे पण वाचा - Video : कोल्हापुरात गाढवासह सत्तर डंपरचा मोर्चा काढला कश्यासाठी पाहा व्हिडीओ

मोर्चात अनिल पाटील, दिनेश माने, सचिन कांबळे, प्रकाश शानवाडे, सुधीर लोले, प्रदीप देवधर, अशोक कुंभार, संभाजी सुर्यवंशी यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.

 
संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: handicapped protest in ichalkaranji