"हिंगणघाट'मधील आरोपीस फाशी द्या 

Hang The Accused In "Hinganghat" Kolhapur Marathi News
Hang The Accused In "Hinganghat" Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेला नराधमाने एकतर्फी प्रेमातून भर चौकात पेटवून हत्या केली. या नराधमाला त्याच चौकात फाशीची शिक्षा द्यावी आणि राज्यातील ख्यातनाम वकील ऍड. उज्ज्वल निकम यांच्यातर्फे जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी आज जनता दलातर्फे करण्यात आली. 

यासंदर्भात प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांच्याकडे जनता दल आणि विविध कार्यकर्त्यांकडून निवेदन देवून निषेध नोंदवण्यात आला. नगरपालिकेतून कार्यकर्ते एकत्र येवून तेथून घोषणा देत प्रांत कार्यालयाच्या दारात आले. तेथे नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडले. 

प्रांत कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरोगामी महाराष्ट्रात जेथे सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या महान महिलेचा जन्म झाला, अशा पुण्य भूमीत ज्ञान दान करणाऱ्या निरपराध शिक्षिकेचा विकृत मनोवृत्तीच्या नराधमाकडून क्रुरतेने झालेली हत्या निंदनीय आहे. यासारख्या प्रवृत्तीवर महाराष्ट्रात कायमपणे जरब बसावी म्हणून अशा आरोपींना तत्काळ फाशी होणे आवश्‍यक आहे. शिक्षेमुळे पुन्हा अशा स्वरूपाचे कोणतेही कृत्य करण्यास कोणी धजावणार नाही. या घटनेबद्दल जनतेतून व्यक्त होणाऱ्या तीव्र भावना शासनापर्यंत प्रशासनाने पोहोचवावी अशी मागणीही करण्यात आली. 

या वेळी नगरसेवक महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर, नगरसेवक नितीन देसाई, उदय कदम, सागर पाटील, तम्मा बोरगावे, राजेश पाटील-औरनाळकर, पप्पू केसरकर, पप्पू सलवादे, जमीर मुल्ला, विनोद लाखे, सुशांत पोवार, इम्रान मुल्ला, सचिन हत्ती, विकास साठे, विनोद बिलावर, राजन जाधव, राजेंद्र बस्ताडे, पापू कागे, संग्राम देवेकर यांच्यासह असंख्य तरूण कार्यकर्ते या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com