सरकारच्या बदनामीचे भाजपचे षडयंत्र ; मंत्री हसन मुश्रीफ  

hasan mushrif criticism on chandrakant patil
hasan mushrif criticism on chandrakant patil

जयसिंगपूर : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र भाजपकडून रचले जात आहे. सत्ता गेल्यानेच ऊठसूट राहूल गांधींवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्यात स्वत:चा एक मतदार संघही तयार करता आला नाही. पदवीधरांसाठी महामंडळ स्थापन करतो म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांनी दोन वेळा निवडून आल्यानंतर काय केले नाही? उलट कामे घेऊन जाणाऱ्या शिक्षकांना त्यांना घराबाहेर काढण्याचा उद्योग केल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. 

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले,""शिरोळ तालुक्‍यातून सर्वाधिक उच्चांकी मतदान मिळविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजचे आहे.'' माजी आमदार उल्हास पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, गणपतराव पाटील, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, खंडेराव जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी स्वागत केले. सर्जेराव शिंदे यांनी आभार मानले. शिरोळ पंचायत समितीच्या सभापती सौ. कविता चौगुले, अमरसिंह माने-पाटील, जयराम पाटील. दादासाहेब लाड, दिलीप पाटील, ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com