esakal | Marathi News Latest & Breaking | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या | eSakal.com
sakal

बोलून बातमी शोधा

He spent six months at sea

जहाज घेऊन सौदे अरेबियाला जाताना हवामान बदलामुळे जहाज बुडाले. सुदैवाने कंपनीच्या दुसऱ्या जहाजाने 20 कर्मचाऱ्यांना वाचविले. मात्र येमेनच्या गार्डनी त्यांना अटक केली. जहाजासह कागदपत्रे, मोबाईल व पासपोर्ट जप्त केले. तब्बल सहा महिन्यांनी मोबाईल परत दिले; पण कॉलिंगगला मान्यता न देता फक्त सोशल मीडिया वापरास मान्यता दिली. त्यातून सर्वांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून सुटका करण्याची विनंती कुटुंबीयांना केली आहे. 

भर समुद्रात त्यांनी काढले सहा महिने

sakal_logo
By
नरेंद्र बोते

कागल : जहाज घेऊन सौदे अरेबियाला जाताना हवामान बदलामुळे जहाज बुडाले. सुदैवाने कंपनीच्या दुसऱ्या जहाजाने 20 कर्मचाऱ्यांना वाचविले. मात्र येमेनच्या गार्डनी त्यांना अटक केली. जहाजासह कागदपत्रे, मोबाईल व पासपोर्ट जप्त केले. तब्बल सहा महिन्यांनी मोबाईल परत दिले; पण कॉलिंगगला मान्यता न देता फक्त सोशल मीडिया वापरास मान्यता दिली. त्यातून सर्वांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून सुटका करण्याची विनंती कुटुंबीयांना केली आहे. 
या 20 जणांत 4 भारतीय, पाच बांगलादेशी व एका इजिप्तीशयन नागरिकाचा समावेश आहे. 14 भारतीयांत महाराष्ट्रातील सहा जण आहेत. कंपनीने पगार न दिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत संबधित कामगारांनी "सकाळ' शी संपर्क साधून व्हॉट्‌सअपद्वारे सर्व माहिती कळविली आहे. 
कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतून 30 तारखेला विमानाने सर्वजण मस्कतला गेले. शिपिंग कंपनीला सौदी अरेबियाचे कॉन्ट्रॅक्‍ट मिळाल्याने दोन जहाज घेऊन 3 फेब्रुवारी 2020 ला ओमानमधून सौदी याम्बो पोर्टला निघाले होते. 12 फेब्रुवारीला हवामानामुळे जहाज बुडाल्याने दुसऱ्या जहाजातून त्यांना वाचविले खराब हवामानामुळे जहाज समुद्रात लंगर केले. हा अँकर पॉईंट येमेनच्या वॉर झोनमध्ये निघाल्याने येमेनच्या गार्डनी सर्वांना अटक केली. 
आज ना उद्या कंपनी मालक आणि एजंट सुटका करतील या आशेवर त्यांनी सहा महिने येमेनमध्येच काढले. गेल्या आठवड्यात सर्वांना मोबाईल दिले. त्यानंतर सर्वांनी कुटुंबांशी संपर्क साधून सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. संबंधित शिपिंग कंपनीकडून आठवड्यात कर्मचाऱ्यांना आणले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पण अजूनही काहीही कार्यवाही झालेली नाही. 

कामगारांची नावे 
संदीप बाळू लोहार (खडकेवाडा ता. कागल), फिरोज नसरुद्दीन झारी (रत्नागिरी), अहमद अब्दुल गफ्फार (दापोली), तन्मय राजेंद्र माने (अलिबाग, मांडवा), निलेश धनाजी लोहार (कौलव, ता. राधानगरी), दाऊद महमूद जीवरक (दापोली, मंडणगड), चेतन हरिश्‍चंद्र गवस (गोवा) मनिराज मरीप्पन, मोहनराज थानीगचलम, व विल्लीयम निकामदेन (तमीळनाडू), अब्दूल वाहब मुस्तहबा (केरळ), हिरोन शेक (पश्‍चिम बंगाल), संजीवकुमार (उत्तर प्रदेश) असे भारतीय व मोहम्मद यौसुफ, मोहम्मद अल्लाउद्दीन, मोहम्मद अलमगिर, मोहम्मद अबू तयुब, मोहम्मद रहीम (बांगलादेश) व इजिप्तच्या फारूक मोहम्मद अब्देलाल अब्देलत्त्य यांचा समावेश आहे. कोल्हापूर कोल्हापूर 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

go to top