आजरा तालुक्‍यात पावसाचा जोर वाढला ; पारपोली ओढ्यातून चार जनावरे गेली वाहून

heavy rain in kolhapur ajra taluka
heavy rain in kolhapur ajra taluka

आजरा - पारपोली (ता. आजरा) येथे सर्फनाला ओढ्यातून चार जनावरे वाहून गेली आहेत. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. शेतकरी संदिप शंकर मिटगे यांचे सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. 

श्री. मिटके यांनी सर्फनाला धरणालगत शेतवडीत नेहमी प्रमाणे जनावरे चरायला सोडली ही जनावरे सर्फनाला ओढा ओलांडून घरी परतत होती. साडेबाराच्या सुमाराला या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यावेळी ओढ्याला अचानक जोरदार पाणी आले. ओढा ओलांडणाऱ्या दोन म्हशी, एक पाडी, व एक रेडी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्या. गावा नजीक ही घटना घडली असून एका म्हशीचे प्रेत ओढ्याकाठच्या झुडपाला अडकल्याचे आढळले. अन्य जनावरे हिरण्यकेशी नदीमध्ये वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. महसुल यंत्रणेने पंचनामा केला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी पी.डी. ढेकळे यांनी शवविच्छेदन केले. 
दरम्यान आजरा तालुक्‍यात पावसाचा जोर वाढला आहे.

पावसामुळे ओढ्या नाल्यांना पाणी आले असून शेतवडीत पाणी घुसले आहे. हिरण्यकेशी व चित्रा नदी पात्राबाहेर पडल्या आहेत. हिरण्यकेशीवरील साळगाव व ऐनापूर बंधारे पाण्याखाली आहेत. तालुक्‍यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 104 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्‍यात पाऊस मापन केंद्रावर नोंदवला गेलेला पाऊस असा ः- आजरा -118, मलिग्रे-76, उत्तूर -67 व गवसे 156 मिलीमीटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com