VIDEO : वादळी पावसाने कोल्हापूरला झोडपले पाहा व्हिडिओ

Heavy rain kolhapur impact kolhapur update news
Heavy rain kolhapur impact kolhapur update news

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने आज रात्री जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आठच्या सुमारास पावसास सुरवात झाली. शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला. 
राजारामपुरी येथील तेराव्या गल्लीत वाहनावर झाड पडल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. शास्त्रीनगर अग्निशमन दलाचा बंब, तसेच जवान झाड बाजूला घेण्यासाठी तातडीने घटनास्थळी 
आर. के. नगर परिसरात विजेचा खांब व झाड कोसळल्याने तारांबळ उडाली. इचलकरंजीसह जिल्ह्यातील बहुतांश भागांतील वीजपुरवठा खंडित झाला.


दिवसभरातील तीव्र उकाडा तसेच लॉकडाउनमुळे घरी थांबून राहिलेल्यांना पावसामुळे दिलासा मिळाला. प्रमुख चौकांतील पोलिसांची पावसामुळे तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट अचानक सुरू झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी मात्र उन्हाचा कडाका अधिक होता. सायंकाळीही रात्री पाऊस पडेल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र, आठच्या सुमारास वादळी वाऱ्यास सुरवात झाली आणि पावसाच्या सरी कोसळण्यास सुरवात झाली. पावसाला वेग इतका होता, की अर्ध्या तासातच शहराच्या सखल भागात पाणी साचले. रस्त्यावर वाहतूक तुरळक होती. त्यामुळे एरवी अचानक पाऊस आल्यावर जी धावपळ उडते, असे चित्र नजरेस पडले नाही.


दिवसभर पंख्यांची घरघर आणि मोबाईलमध्ये व्यस्त असलेल्यांना रात्रीच्या पावसाने दिलासा दिला. जोरदार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला. प्रमुख रस्त्यांवर त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरले. पावसामुळे अग्निशमन दलाची यंत्रणा ‘हाय अलर्ट’ झाली. 
पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले. दुचाकी तसेच चारचाकी चालकांना खड्ड्यांचा तसेच पाण्याचा अंदाज घेत सावधगिरी बाळगावी लागली. पथदीप तसेच घरातील वीज गायब झाल्याने मोबाईलच्या उजेडात रात्रीच्या स्वयंपाकाची जोडणी करावी लागली. साडेआठच्या सुमारास पावसाची गती थोडी कमी झाली. तरीही विजांचा कडकडाट कायम होता. अर्ध्या तासाच्या पावसामुळे मात्र हवेत गारवा निर्माण झाला. मंगळवारी (ता. १३) गुढीपाडवा असल्याने गुढीची काठी खरेदीसाठी प्रमुख चौकातील कोपऱ्यावर थोडीशी वर्दळ दिसत होती.

गुढीची काठी विकणाऱ्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. करवीर, पन्हाळा तालुक्‍यासह बोरपाडळे परिसरात आज रात्री वादळी पाऊस झाला. वीजपुरवठाही खंडित झाला. अचानक आलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली. भोगावतीसह राशिवडे परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्री नऊपासून तब्बल दीड तास पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणी-पाणी झाले. पुनाळ, माजनाळ, पुशिरे तर्फ बोरगाव, म्हाळुंगे तर्फ बोरगाव, दिगवडे, तिरपण, कसबा ठाणे, महाडिकवाडी, कुंभारवाडी, काटेभोगाव, वाळवेकरवाडी, तळेवाडी परिसरात जोरदार पाऊस झाला.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com