हेल्मेटसक्‍तीची पुन्हा सोमवारपासून बेळगावात अंमलबजावणी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. मात्र, याला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.

बेळगाव - विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. मात्र, याला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. विनाहेल्मेटमुळे वाहन चालविणाऱ्यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच वाहतूक पोलिस पुन्हा कारवाईसाठी पुढे सरसावले आहेत. 

सोमवार (ता. १७) पासून पुन्हा हेल्मेटसक्‍तीची कडक अमंलबजावणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, आज वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी थांबून विनाहेल्मेट वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. स्मार्ट सिटी अंतर्गत शहारातील ठिकठिकाणच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहतूक धीम्यागतीने सुरु आहे. त्यातच स्मार्ट रस्त्यांच्या कामामुळे आतापर्यंत तिघांचे बळी गेले आहेत. वाहतूक पोलीस विनाहेल्मेट तसेच वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करतच आहेत. त्यातच पोलिसांना चकवा देऊन विनाहेल्मेट वाहने हाकणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. तशा वाहनचालकांना अपघात झाल्यास डोकीला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी याची दखल घेतली असून येत्या सोमवारपासून पुन्हा हेल्मेटसक्‍तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

वाचा - Valentine Day Special ; सलाम तिच्या धाडसी निर्णयाला; कर्करोगग्रस्त प्रथमेशसोबत केला विवाह

विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. मात्र, याला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. विनाहेल्मेटमुळे वाहन चालविणाऱ्यांच्या डोक्याला दुखापत होऊन त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच वाहतूक पोिलस पुन्हा कारवाईसाठी पुढे सरसावले आहेत. 

सोमवार (ता. १७)पासून पुन्हा हेल्मेटसक्‍तीची कडक अमंलबजावणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, आज वाहतूक पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी थांबून विनाहेल्मेट वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. स्मार्ट सिटी अंतर्गत शहारातील ठिकठिकाणच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. शहरातील प्रमुख मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहतूक धीम्यागतीने सुरु आहे. त्यातच स्मार्ट रस्त्यांच्या कामामुळे आतापर्यंत तिघांचे बळी गेले आहेत. वाहतूक पोलीस विनाहेल्मेट तसेच वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करतच आहेत. त्यातच पोलिसांना चकवा देऊन विनाहेल्मेट वाहने हाकणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. तशा वाहनचालकांना अपघात झाल्यास डोकीला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी याची दखल घेतली असून येत्या सोमवारपासून पुन्हा हेल्मेटसक्‍तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Helmet's re-enactment in Belagavi from Monday