कासारकांडगाव-जेऊर रस्त्यावर गव्यांचे ठाण

A Herd Of Gaur In Kasarkandgaon Area Kolhapur Marathi News
A Herd Of Gaur In Kasarkandgaon Area Kolhapur Marathi News

आजरा : कासारकांडगावपासून हाकेच्या अंतरावर कासारकांडगाव-जेऊर रस्त्यावर गेले कित्येक दिवस गव्याचा कळप बिनधास्तपणे वावरत आहे. दिवसा ढवळ्या रस्त्याच्याकडेला गवे चरताना पहावयास मिळत आहेत. त्यांना हाकलण्यासाठी प्रयत्न केले तरी ते बाजूला जात नसल्याचे वाहनधारक सांगतात. 

जेऊर मार्ग जाणारा आजरा चंदगड रस्ता नजीकचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गे चंदगडचे अंतर कमी होत असल्याने या मार्गावरून या काही वर्षात मोठी रहदारी वाढली आहे. या मार्गावर गेले तीन चार महिन्यापासून गव्यांचा कळप वावरत आहे. या मार्गावरून जात असताना हा कळप अगदी रस्त्याकडेला बिनधास्तपणे चरताना पहावयास मिळतो.

आज दुपारी तीनच्या सुमाराला या परिसरात गव्यांचा कळप उतरला होता. या कळपात सुमारे दहा ते पंधरा गवे होते. हे गवे रस्त्याच्यानजीक चरत असतांना दिसत होते. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना गवे पहावयास मिळाले. वाहनधारकांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला पण, ते तेथून हलले नाहीत. वाहनधारक व ये-जा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून ते बिनधास्तपणे चरत होते. या परिसरात ते दररोज चरावयास येत असल्याचे जेऊर येथील पेडणेकर फॉर्म हाऊसचे मालक हेमंत पेडणेकर यांनी सांगितले. 

बुजरा गवा झाला "बिनधास्त' 
गवा हा बुजरा प्राणी आहे. पण तो रस्त्यावर येवून बिनधास्तपणे वावरत आहे. या परिसरात येणारे गवे बुजरे राहिलेले नाहीत, असे दिसत असल्याचे पर्यावरण प्रेमी अनंत पाटील यांनी सांगितले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com