बेळगावातील हेस्कॉमचे कार्यालय पुन्हा सीलडाऊन

Hescom's office in Belgaum is closed
Hescom's office in Belgaum is closed

बेळगाव - हेस्कॉमच्या कार्यालयातील आणखीन दोघांना कोरोनाची लागण झाल्याने रेल्वे स्टेशन समोरील हेस्कॉमचे कार्यालय सिलडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे विविध कामांसाठी हेस्कॉम कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत असून सोमवारी पुन्हा  कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशन आणि नेहरू नगर येथील कार्यालयात प्रत्येकी एका कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे 3 दिवस कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर निर्जंतुकीकरण करून कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले होते मात्र गुरुवारी पुन्हा कार्यालयातील एक मीटर रिडींग कर्मचाऱ्यासह आणखीन एका कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने कार्यालय बंद करण्यात आले. हेस्कॉम व कॅन्टोनमेंट बोर्डातर्फे कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.

त्यानंतर सोमवार पासून पुन्हा कार्यालय सुरू केले जाणार आहे.  मात्र कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करून आणि आवश्यक उपाय योजना करूनही कार्यालयात कोरोनाचा शिरकाव होत असल्याने कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. यापुढे कार्यालयात अधिक खबरदारी घेण्याचा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


 कार्यालयातील आणखीन दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर खबरदारी म्हणून कार्यालय तीन दिवस बंद राहनार आहे. निर्जंतुकीकरण व इतर आवश्यक उपाय योजना करून पुन्हा कार्यालय सुरू केले जाईल.
- अरविंद गदगकर, सहायक कार्यकारी अभियंता, हेस्कॉम
 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com