"सीमाभागातील शैक्षणिक संकुलाचे अभ्यासक्रम नव्या वर्षापासून"

ओंकार धर्माधिकारी | Friday, 9 October 2020

तुडये गावालगतच दहा एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी बनवला असून याची ही कार्यवाही लवकरच

कोल्हापूर : सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या शैक्षणिक संकुलाचे अभ्यासक्रम जानेवारीमध्ये सुरू होतील. चंदगड मधील शिनोळी आणि तूडये दरम्यान एका खासगी कंपनीची जागा तात्पुरती भाडेतत्त्वावर घेण्यात आली असून, येथे हे अभ्यासक्रम शिकवले जातील. तुडये गावालगतच दहा एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी बनवला असून याची ही कार्यवाही लवकरच होईल. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

   विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्री सामंत आज कोल्हापुरात आले होते. आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री सामंत म्हणाले, 'सीमा भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेता यावे, यासाठी तेथे राज्य सरकार शैक्षणिक संकुल उभारणार आहे. हे शैक्षणिक संकुल भव्य असावे अशी येथील विविध सामाजिक, शैक्षणिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. गरज पडल्यास यासाठी निधी संकलनाची ही त्यांची तयारी आहे. शैक्षणिक संकुलाचे अभ्यासक्रम मात्र जानेवारी महिन्यापासून सुरु होतील. यासाठी एका खासगी कंपनीची जागा तात्पुरती भाडेतत्त्वावर घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुडये गावाजवळ दहा एकर जमिनीचा प्रस्ताव बनवला असून लवकरच याबाबत पुढील कार्यवाही होईल.'

हेही वाचा- फुटपाथचाच आधार : दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला -
   परीक्षांबाबत मंत्री सामंत म्हणाले 'मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान पाच लाख लोकांनी एकाच वेळी परीक्षेचे पेज ओपन  केले. त्यामुळे सारी यंत्रणा कोलमडली. हा एक प्रकारचा सायबर हल्ला असून याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी याचा तपास करत आहेत. अशा प्रकारचा कोणताही हल्ला, गोंधळ अथवा तांत्रिक समस्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान उद्भवू नये यासाठी सर्व ती काळजी घेतली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. विद्यापीठाची तयारी चांगली असून अंतिम टप्प्यात आली आहे. सराव परीक्षा घेण्याचाही त्यांचा मानस आहे. या सर्व परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील.

Advertising
Advertising

त्यांची परीक्षा पुन्हा घेऊ
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोरोना संसर्ग होईल. किंवा अन्य कोणत्याही कारणाने परीक्षा देता येणार नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल.  विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये. आता होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थी नापास होतील त्यांची ही परीक्षा लगेच घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले जाईल. असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘मैदान ए जंग’चा थरार सुरू व्हायलाच हवा! -

एक दृष्टिक्षेप

ऑनलाइन परीक्षा देणारे विद्यार्थी - ५०४१७
ऑफलाइन परीक्षा देणारे विद्यार्थी - १३०००
नोंदणी न केलेले विद्यार्थी - १०,०००
एकुण विद्यार्थी संख्या - ७४०११

विद्यार्थिनी - ३९,४१५
विद्यार्थी - ३४,४९९
दिव्यांग - २०२

ऑफलाइन परीक्षा केंद्र - २९३ (तीन जिल्हयातील)

संपादन- अर्चना बनगे