पदोन्नतीच्या प्रतीक्षेत त्यांचा संधीकाल

शिवाजी यादव
शुक्रवार, 31 जुलै 2020

शेती उत्पन्न बाजार समितीत दहावी शिकलेला चतुर्थश्रेणी कर्मचारी आज "साहेब' झाला. बारावी पदवीधर झालेले कर्मचारी व पंधरा वीस वर्षे नोकरी झाली तरी सुरक्षारक्षक किंवा शिपाईच आहेत. ठरावीक कर्मचाऱ्यांची पदोन्नती "नियमा'ने झटपट झाली. काहीजण पदोन्नतीची प्रतीक्षा करीत निवृत्तीकडे झुकू लागले आहेत. काहीजण दाद मागण्यासाठी न्यायदेवतेचा धावा करीत आहेत. वीसहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या स्वप्नाला तडा गेला आहे. 
 

कोल्हापूर ः शेती उत्पन्न बाजार समितीत दहावी शिकलेला चतुर्थश्रेणी कर्मचारी आज "साहेब' झाला. बारावी पदवीधर झालेले कर्मचारी व पंधरा वीस वर्षे नोकरी झाली तरी सुरक्षारक्षक किंवा शिपाईच आहेत. ठरावीक कर्मचाऱ्यांची पदोन्नती "नियमा'ने झटपट झाली. काहीजण पदोन्नतीची प्रतीक्षा करीत निवृत्तीकडे झुकू लागले आहेत. काहीजण दाद मागण्यासाठी न्यायदेवतेचा धावा करीत आहेत. वीसहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या स्वप्नाला तडा गेला आहे.

बाजार समितीत 24 जागांवर चार हजार उमेदवारांचे अर्ज बाजूला ठेवून संचालकांना नात्यातील 29 जणांची भरती केली. मागील वर्षीपासून ते सेवेत असल्याचे कादावर दाखवून नवख्यांना कायम सेवेत असल्याचेही दाखवले गेले. ही चमत्कारिक स्थिती अनेक कर्मचाऱ्यांना हवालदिल करून गेली. कारण हे कर्मचारी बहुतेक जण शेती करीत थोडे शिकले. पुढे बाजार समितीत शिपाई म्हणून नोकरीस लागले. कोणी वॉचमन म्हणून लागले. वीस वर्षे होत आली तर याच पदावर आहेत. काहीजण पदवीधर न होताच अधिकारी झाले. अधिकारी म्हणून त्यांनी काम चांगलेही केले. सुरक्षा रक्षक, शिपाई आहेत त्यांनी पुढे शिक्षण घेतले पदवीधर झाले अन्य काही अभ्यासक्रम केला कधीतरी आपणही पदोन्नतीने अधिकारी होऊ यासाठी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न मात्र साकारण्याला पाच वर्षे खीळच बसली आहे.

पदोन्नती देण्यात टाळाटाळ करण्यास फक्त विद्यमान संचालकच नव्हेतर यापूर्वीच्या संचालक मंडळातील ही काही कारनामे कारणीभूत आहेत. त्यांनी पाच वर्षाची सेवा झालेल्यांना पदोन्नती देत 15 वर्षे सेवा बजावणाऱ्याला बाजूला ठेवले असेही घडले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. 

दृष्टिक्षेपात कर्मचारी 
- एकूण 116 कर्मचारी 
- 16 जागा रिक्त 
- ऑक्‍टोबरमध्ये तिघे निवृत्त 
- एकूण 145 जागा 

संपादन ः रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: His opportunity awaiting promotion