महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांना आता 'हा' नियम ; 8 जुलैपासून होणार कार्यवाही

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी परराज्याहून येणाऱ्यांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक होते.

बेळगाव - महाराष्ट्रासह अन्य राज्याहून येणाऱ्यांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सक्ती रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी 14 दिवस होम क्वारंटाईन असणार आहे. परराज्याहून कर्नाटकाला येणाऱ्यांसाठी सुधारीत नियमावली आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली असून, त्यात संस्थात्मक क्वारंटाईनची अट मागे घेतली आहे.

महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यासाठी परराज्याहून येणाऱ्यांसाठी संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक होते. आता नियमात बदल करण्यात आले आहे. संस्थात्मक क्वारंटाईनची अट मागे घेतली आहे. यामुळे महाराष्ट्राहून कर्नाटकात येणाऱ्यांसाठी सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि सात दिवस होम क्वारंटाईन संदर्भामध्ये असलेली अट मागे घेतली आहे. त्याजागी 14 दिवस होम क्वारंटाईन सक्ती करण्यात आली आहे. सुधारित नियमावली 8 जुलैपासून लागू केली जाणार आहे.

वाचा - बेळगाव महापालिकेत प्रवेश बंदी... पण का...?

क्वारंटाईन नियमावली सातत्याने बदलते. अनलॉकमध्ये क्वारंटाईन नियमात बदल केले आहेत. यामध्ये आता सरसकट होम क्वारंटाईची सक्ती मागे घेण्यात आली आहे. 26 जुलैपर्यंत सुधारीत नियम लागू असणार आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. महाराष्ट्र, अन्य राज्यामधून येणाऱ्यांसाठी सेवा सिंधूवर ऑनलाईन अर्ज करणे जरुरी आहे. पण, अर्ज केल्यानंतर अनुमतीची गरज नाही, असे कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home quarantine only for those coming in karnataka from Maharashtra