शरद पवार यांच्यामुळेच महिलांना सन्मान ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 

Honoring women only because of Sharad Pawar Rural Development Minister Hasan Mushrif
Honoring women only because of Sharad Pawar Rural Development Minister Hasan Mushrif

कोल्हापूर - समाजात पुरुषांच्या बरोबरीने माता-भगिनींचीही संख्या निम्मी आहे. राजकारणात महिलांना निम्म्याहून अधिक जागांवर आरक्षण देऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महिलांनी पक्षाची ध्येय, धोरणे समाजात तळागाळापर्यंत रुजवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी बैठकीत मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर होत्या. 

मुश्रीफ पुढे म्हणाले, "शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य गोरगरीब बहुजनांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या मातीत रुजला आहे. यामध्ये माता-भगिनींचे ही योगदान मोठे आहे.' सौ. चाकणकर म्हणाल्या,"आमचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवून पक्षीय संघटनाच्या बांधणीसाठी महाराष्ट्र भरच्या महिला भगिनीं सरसावल्या आहेत.' 

जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील म्हणाले, "आमचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्या प्रेरणेने सौ. चाकणकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर महिला प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसची घोडदौड जोरात सुरू आहे. कोल्हापूर जिल्हाही यामध्ये मागे राहणार नाही.' 

स्वागत व प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा सौ. शीतल फराकटे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील यांनी केले. आभार सौ.वृषाली पाटील यांनी मांडले. 

महाराणी ताराराणीच्या लेकी 
सौ.चाकणकर म्हणाल्या,"करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या पवित्र भूमित कोल्हापुरातील माता-भगिनींचे हेच संघटन संपूर्ण राज्य आणि देशासाठी लौकीकास्पद ठरेल. महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचे तेज इथल्या प्रत्येक माता-भगिनीमध्ये आहे.' 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com