पती आणि मुलीसाठी तिन केले लैगिंक अत्याचार सहन

 Husband and daughter endured sexual abuse
Husband and daughter endured sexual abuse

इचलकरंजी ः पती व मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याप्रकरणी उद्योजक नितीन दिलीप लायकर (रा. साखरपे हॉस्पिटलजवळ) याच्यासह तिघांवर गावभाग पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिली असून, याबाबत अद्याप कोणासही अटक केलेली नाही. याबाबतची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिली. 
संशयित लायकर यांने जुना चंदूर रोडवरील रिया अपार्टमेंटमध्ये, बादशहा पेट्रोलपंपाजवळील एका अपार्टमेंटमध्ये तसेच मुसळे हायस्कूलनजीक महिलेच्या भाड्याच्या घरात पीडित महिलेवर पती व मुलीस ठार मारण्याची धमकी देऊन मार्च 2019 ते 16 जून 2019 या कालावधीत बलात्कार केला. ऑक्‍टोबर 2019 मध्ये पीडित महिलेला मोबाईलवरून पती व मुलीस ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर 13 डिसेंबर 2019 रोजी पीडित महिलेला मोबाईलवर कॉल करून कुपवाड, सांगली येथील प्लॉट आपल्या नावावर करण्याची करण्याची मागणी केली. तसे न केल्यास सांगलीतील गुंड तुमचा गेम करणार असल्याची धमकी दिली.

दरम्यान, 5 ऑगस्टला रात्री 10.30 वाजता काळ्या ओढ्यानजीक दोन अनोळखींनी हातामध्ये चाकू घेऊन पीडित महिला व तिच्या पतीला अडवले. नितीन लायकरविरोधात पोलिसांत तक्रार केल्यास अश्‍लील चित्रफीत व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दोघांनी दिली. त्यानंतर तेथून ते निघून गेले. याबाबत पीडित महिलेने गावभाग पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी नितीन लायकरसह दोन अनोळखींवर विविध चार कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. अद्याप याबाबत कोणासही अटक केलेली नाही. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. लोहार करीत आहेत.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com