स्वच्छ सर्वेक्षणासाठी इचलकरंजीत यंत्रणा गतिमान

स्वच्छ सर्वेक्षणासाठी इचलकरंजीत यंत्रणा गतिमान

इचलकरंजी : पुढील महिन्यात केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा आतापासूनच गतिमान झाली आहे. यंदा मानांकनात चांगली सुधारणा करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
इचलकरंजी शहराचा 1 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या विभागात समावेश आहे.

दरवर्षी केंद्र शासनाच्या पथकाकडून सर्वेक्षण केले जाते. यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यरत आहे. यापूर्वी शहरात अनेक ठिकाणी कचरा कोंडाळे होते. आता अशा बहुतांश ठिकाणांचे सुशोभीकरण केले आहे. शौचालययुक्त शहराची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. 

घंटागाडी उपक्रमामुळे गटारीत अथवा चौकाचौकांत पडणारा कचरा आता थांबला आहे. आता कचरा विलगीकरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी पालिकेने मिळकत धारकांना मोफत दोन बकेटचे वाटप केले होते; पण त्याचा वापर होताना दिसत नाही. आजही घंटागाड्यामध्ये सुका व ओला अशा प्रकाराच कचरा संकलित केला जात नाही. आता यावर भर देण्याचे काम सुरू केले आहे. 

कचरा विलगीकरण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे. सर्वात मोठा प्रश्‍न घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा आहे. त्या कामाला गती आली आहे. लवकरच दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यावर त्याच दिवशी प्रक्रिया करण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे दररोज निर्माण होणाऱ्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. स्वच्छतेबाबत विशेष दक्षता घेण्याबाबत कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रशासनाकडून सूचना दिल्या जात आहेत. 

स्वच्छतेच्या कामावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत असतो. अनेकवेळा याबाबत तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये यश मिळविण्याचे मोठे आव्हान पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आहे. गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे आरोग्य विभागाला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते. या पार्श्‍वभूमीवर यदा मानांकनामध्ये सुधारणा करण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण मानांकन दृष्टिक्षेप 
2017- 141 
2018-80 
2019- 107 
2020- 89 

विविध उपक्रम
या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण मानांकनामध्ये चांगली सुधारणा होण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. 
- डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी, इचलकरंजी नगरपरिषद

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com