Ichalkaranji corporeter Tēlanāḍē bandhūnnā bākī
Ichalkaranji corporeter Tēlanāḍē bandhūnnā bākī

नगरसेवक तेलनाडे बंधूंना दिलासा 

इचलकरंजी ः नगरसेवक तेलनाडे बंधू यांना अपात्र ठरविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. याबाबतचा आदेश नगर विकास विभागाचे कार्यासन अधिकारी प्रवीण पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. इचलकरंजी पालिकेलाही आदेशाची प्रत मिळाली आहे. त्यामुळे नगरसेवक तेलनाडे बंधूना दिलासा मिळाला असून त्यांच्या प्रभागातील संभाव्य पोटनिवडणूक प्रक्रिया आता थांबणार आहे.

नगरसेवक संजय व सुनील तेलनाडे बंधूंवर मोका अंतर्गत कारवाई झाली आहे. दोघेही पसार आहेत. पालिका सर्वसाधारण सभांतील कामकाजावेळी सलग सहा महिने गैरहजर राहिल्याच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे. त्यानंतर पालिकेने त्यांच्या प्रभाग 18 (ब) व 31 (ब) या प्रभागातील पोटनिवडणूक घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्यावर आयोगांने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यामुळे लवकरच निवडणूक लागण्याची दाट शक्‍यता होती. मात्र तेलनाडे बंधूंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात नगर विकास विभागाकडे अपील दाखल केले होते. त्यावर आज नगरविकास मंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या 20 मार्च 2020 च्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे तूर्तास तरी या दोन्ही प्रभागातील पोटनिवडणूक प्रक्रिया थांबणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांनाही अपात्र ठरविले होते. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द झाले होते; मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यांने तेलनाडे बंधूंचे नगरसेवक पद अबाधित राहिले आहे. या स्थगिती आदेशावर लवकरच नगरविकास मंत्र्यांसमोर सुनावणी होणार आहे. मात्र त्याची तारीख अद्याप निश्‍चित नाही. लवकरच सुनावणीची तारीख व वेळ कळविण्यात येईल, असे नगरविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

एकाच प्रभागात पोटनिवडणूक 
शहरातील एकूण तीन प्रभागातील तीन जागांसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्‍यता होती. मात्र नगरविकास मंत्र्यांच्या स्थगिती आदेशानंतर आता 5 (अ) या एका जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची दाट शक्‍यता आहे. कोल्हापूर कोल्हापूर 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com