50 वर्षांपूर्वीच 'नॅनो'सारखी छोटी कार मराठी माणसांनी बनवली होती आणि तीही इचलकरंजीत... तिचं नाव होतं

Ichalkaranji mira car  driven a small car like Nano fifty years ago
Ichalkaranji mira car driven a small car like Nano fifty years ago

इचलकरंजी (कोल्हापूर) : महाराष्ट्राची मॅंचेस्टर नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी शहर या उद्योगनगरीत पन्नास वर्षापूर्वी नॅनोसारखी एक छोटीशी कार धावली होती. शासनाच्या लाल फितीच्या कारभारात ही कार अडकल्याने त्या नॅनोकारची ही धाव त्याकाळी अखेरची ठरली. मीरा नावाने धावलेली ही कार आजही इचलकरंजीकरांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट  आहे.

इचलकंजी शहरापासून काही अंतरावर असलेल्या मानकापूर या गावातील कुलकर्णी कुटुंबीय उद्योगाच्या निमित्ताने इचलकरंजीत आले. शंकरराव कुलकर्णी यांना काहीतरी सातत्याने नवीन करायचे हा ध्यास होता. त्यामुळे त्यांनी त्यावेळी छोटी कार बनवण्याचा निर्णय घेतला. या कारसाठी लागणारे सर्व सुटे भाग त्यांनी तयार केले. या कारची किंमत त्यावेळी फक्त बारा हजार रुपये होती. पाच सीटर व वीस किलो मीटर प्रति लिटर मायलेज अशी या कारची वैशिष्ट्ये होती. विशेष म्हणजे हे सर्व सुट्टे भाग भारतीय बनावटीचे होते.

पहिली कार 1949 मध्ये

त्याकाळात शंतनुराव कुलकर्णी, मोहन धारिया, शंकरराव चव्हाण, राजारामबापू पाटील यासारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी या कारमधून प्रवास केला होता. किर्लोस्कर मध्ये काम करणाऱ्या शंकरांनी आपल्या पंधरा जणांच्या टीम सोबत 1945 मध्ये कार बनवण्याचे आपल्या कल्पनेवर काम सुरू केले आणि 1949 मध्ये शंकररावांनी या कारचे पहिले मॉडेल तयार केले होते. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसे बसू शकत असत. ही सध्याच्या नॅनो कार एवढीच आकाराची होती. पुढच्या दोन दशकांच्या काळात या  मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्यावत असे आणखी पाच मॉडेल त्यांनी बनवले.

नोंदणी क्रमांक एमएच के 1906

 शंकरराव कुलकर्णी यांनी जी पहिली कार बनवली होती. तिचा आरटीओ मधील नोंदणी क्रमांक एमएच के 1906 असा होता. इचलकरंजीच्या रस्त्यावर शंकररावांनी ही कार चालविण्यास सुरुवात केली. परंतु व्यावसायिक पातळीवर या कार निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकरराव यानी कार मुंबईत आणली होती. 

लालफिताचा फटका...
जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या निर्मितीसाठी शंकररावांना जागा सुद्धा उपलब्ध करून दिली होती. मात्र शासनाच्या लाल फितीच्या कारभारात या प्रकल्पाचे पुढे काहीच होऊ शकले नाही. मीरा कारचे हे मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता होती. अनेक शासकीय परवानगी देखील गरजेच्या होत्या. मात्र त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्याचवेळी त्या काळात सुझुकी सारख्या कंपनीने या क्षेत्रात भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली होती.  त्यामुळे शंकरराव कुलकर्णी यांचा हा परवाना नाकारण्यात आला. त्यामुळे या कारचे उत्पादन पुढे होऊच शकले नाही. नॅनोकार सारखीच छोटी कार तब्बल पन्नास वर्षापूर्वी संपूर्ण देशी बनावटीची आणि तेही चक्क इचलकंरजी सारख्या एका छोट्या शहरांमध्ये तयार झाली होती.


 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com