इचलकरंजीत पालिकेच्या रिफ्यूज कॉम्पॅक्‍टर वाहनाला आग 

Ichalkaranji Municipal Refuge Compactor vehicle on fire
Ichalkaranji Municipal Refuge Compactor vehicle on fire

इचलकरंजी - कचरा वाहतूक करणाच्या पालिकेच्या मालकीच्या रिफ्यूज कॉम्पॅक्‍टर वाहनाला शॉर्ट सर्किटने आग लागली. यामध्ये चालक केबीन पूर्णपणे जळून खाक झाले. काल (ता.15) दुपारी आसरानगर येथील कचरा डेपोवर ही घटना घडली. प्रसंगावधान दाखवित चालकाने सुरक्षीत स्थळी धाव घेवून जीव वाचवला. वर्षभरापूर्वीच हे नवीन वाहन खरेदी केले होते. 

घंटागाडीतील कचरा एकत्र करुन तो रिफ्यूज कॉम्पॅक्‍टर वाहनातून आसरानगरमधील डेपोवर टाकला जातो. नेहमीप्रमाणे काल कचरा टाकण्यासाठी हे वाहन गेले होते. डेपोवर वाहन मागे घेत असताना बॉनेटमध्ये शॉर्ट सर्किट होवून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे प्रसंगावधान राखून चालकाने सुरक्षीतस्थळी धाव घेतली. काही वेळातच आग वाढत गेली. आग विझवण्यासाठी पाण्याची अथवा आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध नव्हती. त्यामुळे काही वेळातच या वाहनाची चालक केबीन जळून खाक झाली. यावेळी बॅटरी काढून टाकली. त्यामुळे दुर्घटना टळली. 

सध्या हे वाहन कचरा उठाव व वाहतूक करणाऱ्या औरंगाबादच्या आदर्श मॅनेजमेंट कंपनीच्या ताब्यात दिले होते. वर्षभर आराध्या एंटरप्रायजेस या मक्तेदार कंपनीकडे हे वाहन होते. या घटनेची माहिती घेतली असून याबाबतची पोलिसांत तक्रार देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी सांगितले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com