इचलकरंजी स्थायी समितीची सभा 28 पर्यंत तहकूब

Ichalkaranji Standing Committee Meeting Scheduled Till 28th Kolhapur Marathi News
Ichalkaranji Standing Committee Meeting Scheduled Till 28th Kolhapur Marathi News

इचलकरंजी : पालिकेची स्थायी समितीची सभा 28 जानेवारीपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय आज झाला. पालिका सभागृहात नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. या वेळी उत्पन्नाचे विविध स्रोत सदस्यांकडून सुचविण्यात आले. 

2020-21 च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्याचा विषय सभेसमोर होता. चर्चेवेळी उत्पन्नवाढीच्या विविध तरतुदी वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या. आपापल्या विभागाला भरीव तरतूद करण्याची मागणी सर्वच सभापतींकडून करण्यात आली. त्यामुळे सभेत कोणताच निर्णय झाला नाही. या वेळी उत्पन्नाचे विविध स्रोत सुचविण्यात आले. 

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नजीकच्या काळात शहरातील मिळकती वाढणार असल्याने करातून मिळणारे उत्पन्न वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे करातून मिळणाऱ्या 22 कोटींच्या उत्पन्नामुळे आणखी तीन कोटी रुपयांची वाढ सुचवण्यात आली. दुकान गाळ्यांच्या लिलावातून किमान साडेतीन कोटी रुपये पालिकेला उत्पन्न मिळणार आहे. त्याचाही अंदाजपत्रकात अंतर्भाव करण्याची सूचना केली.

आपापल्या विभागाला बजेट वाढवून देण्याची मागणी बहुतांश सभापतींनी केली. पाच ते आठ कोटींपर्यंत बजेट वाढविण्यावर चर्चा करण्यात आली. मात्र, आजच्या सभेत कोणताही ठराव केला नाही. अंतिम निर्णय घेण्यासाठी 28 जानेवारीपर्यंत सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

नियमानुसार 31 जानेवारीपर्यंत स्थायी समितीच्या मंजुरीसह अंदाजपत्रक सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठवावे लागणार आहे. सभेला उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, सदस्य दीपक सुर्वे, उदयसिंह पाटील, किसन शिंदे, सारिका पाटील, संजय केंगार, सागर चाळके, युवराज माळी, शकुंतला मुळीक उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com