मेडिक्लेम पॉलिसी घेताय मग ही घ्या दक्षता

लुमाकांत नलवडे | Saturday, 29 August 2020

कोल्हापूर ः रुग्णाचा आरोग्य विमा (मेडिक्‍लेम) आहे. तरीही रुग्णालयात दाखल झाल्यावर बिल देताना वाद होतो. उपचार घेणे आणि त्यावेळी झालेली धावपळ यातून "जाऊ दे' या भावनेतून सर्व बिल आदा केले जाते. काहीजण वाद घालतात. काहीजण तोडफोडच करतात; पण हे सर्व का होते? खरोखरच आरोग्य विम्यात फसवणूक झाल्यास काय करता येईल. त्यासाठी ग्राहक न्यायालयात जावे, की पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, की अन्य काय करावे, याबाबत काही तज्ज्ञांशी, ग्राहकांशी, विमा कंपनीतील अधिकाऱ्यांशी व रुग्णालयातील संबंधितांशी संवाद साधला. त्यातून पुढे आले की, पॉलिसी उतरताना दिलेली आश्‍वासने आणि प्रत्यक्षात कागदावर असलेली आश्‍वासने, दवाखान्यांची यादी यात तफावत असते. त्यामुळेचे वादाचे प्रसंग येतात. अशावेळी आयआरडीएकडे केवळ एका ईमेलद्वारे तक्रार नोंदविता येते. 

विमा उतरतानाच्या अडचणी 
शंभर टक्के कॅसलेस उपचार मिळणार, असे सांगितले जाते 
विमा रकमेत व्यक्ती किंवा कुटुंब आहे, याची सविस्तर माहिती बहुदा नसते 
वार्षिक हप्ते, नूतनीकरणाबाबत योग्य माहिती न देणे 
कॅशलेस रुग्णालयांची अपडेट यादी न देणे 
कोणते आजार समाविष्ट नाहीत, हे सांगण्याचे टाळणे 
कंपनी-बॅंक यांच्यातील कराराबाबत सविस्तर माहिती न देणे 
नूतनीकरणावेळी वाढीव रक्कम किती याची माहिती न देण 
 यामुळे होतात वादाचे प्रसंग 
शंभर टक्के कॅसलेस उपचार न मिळाल्यामुळे 
कॅशलेस रुग्णालयांच्या यादीतून संबंधित रुग्णालय वगळणे 
आरोग्य विमा उतरला असतानाही कंपनी क्‍लेम देत नाहीत 
रुग्णालयाने जादा पैसे घेतले तर 
ठराविक बाबी (ग्लोज व इतर सुविधा) क्‍लेममध्ये टाळल्यास 
अपेक्षेपेक्षा जादा बिल झाल्यास क्‍लेमवरील पैसे द्यावे लागणे 

ग्राहकांनी घ्यावयाची दक्षता 
ज्या कंपनीकडून क्‍लेम केला आहे, त्यांच्याकडे तक्रार करणे 
क्‍लेम आणि त्यातील अटींची पुन्हा पाहणी करणे 
रुग्णालयात उपचार घेण्यापूर्वी क्‍लेमची विचारणा करणे 
विमा हप्ता भरताना अपडेट रुग्णालयांची माहिती घेणे 
विमा पॉलिसीचे वेळेत नूतनीकरण करणे 
बॅंक-विमा कंपनीतील कराराबाबत तीन महिन्यांनी एकदा माहिती घेणे 
एजंटांकडील आणि कंपनीची माहिती ऑनलाईन तपासून पहावी 
-- 
विमा कंपनीबाबत 
विमा कंपन्या शंभर टक्के कॅसलेस सेवा देत नाहीत 
कॅशलेस सेवेत 80-90 टक्केच बिल कंपनी देते 
किती हप्ता किती व्यक्तीसाठी हे सांगते. 
नूतनीकरणापूर्वी महिनाभर एसएमएसद्वारे आठवण करून देते 
मुदत संपली तरीही महिनाभरात पॉलिसी पुन्हा नूतनीकरण होऊ शकते 
ऑनलाईन तक्रार नोंदविता येते. 
पॉलिसीप्रमाणे सोयी-सुविधा असतात 
पॉलिसीची रक्कम एकत्रित की स्वतंत्र हे सांगितले जाते 

ग्राहकांनी तक्रार कोठे करावी? 
इन्श्‍युरन्स रेग्युलेटरी ऍण्ड डेव्हलपमेंट ऑथरेटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) यांच्याकडे ग्राहक थेट ईमेलद्वारे कोणत्याही विमा कंपनीबाबत तक्रार करू शकतो. विमा उतरण्यापूर्वीही या संकेतस्थळावरून अधिक माहिती घेणे फायद्याचे ठरू शकते. या माध्यमातून कोणताही ग्राहक ऑनलाईन (ईमेलद्वारे) येथे तक्रार नोंदवू शकतो. यासाठी थेट तुम्हीच जाब विचारू शकता. यासाठी मध्यस्थीची गरज नाही. आयआरडीएआय तुम्हाला तुमच्या विम्याची रक्कम मिळवून देऊ शकते. या व्यतिरिक्त ही ग्राहक न्यायालयात सुद्धा दाद मागू शकतात.

-संपादन - यशवंत केसरकर