दुधाळी अत्याधुनिक शुटींग रेंजचे उद्‌घाटन

Inauguration of Dudhali Sophisticated Shooting Range
Inauguration of Dudhali Sophisticated Shooting Range

कोल्हापूर ः नेमबाजी क्रीडा प्रकारातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होतात. त्यांना शासनाकडून प्रशासकीय सेवेत नोकरीच्या संधीही उपलब्ध होतात. त्यामुळे युवा पिढीने नेमबाजी,या क्रीडा प्रकाराकडे करिअरचे माध्यम म्हणून पहावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. 
दुधाळी येथील नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफल रेंजच्या उद्‌घाटना वेळी ते बोलत होते. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतूराज पाटील प्रमुख उपस्थित होते. 
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, "" (कै) सखारामबापू खराडे आणि रायफल महर्षी जयसिंगराव कुसाळे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या शूटिंग रेंजला मोठी परंपरा आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चांगले नेमबाज निर्माण होतील. सर्वसामान्यांना याचा उपयोग होणार आहे. नेमबाजीच्या माध्यमातून जे आंतरराष्ट्रीय पातळीचे खेळाडू निर्माण होतात. त्यांना प्रशासकीय सेवेत नोकरी मिळते. त्यामुळे या क्रीडा प्रकाराकडे युवक आणि युवतींनी वळणे गरजेचे आहे. कोल्हापूरला जो शूटिंगला जो इतिहास आहे तो यापुढेही कायम राहील. त्यासाठी खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देऊ.'' 
दरम्यान, दुधाळी शुटिंग रेंजमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाज सहज तयार होतील, अशी अत्याधुनिक दहा मीटर एअर रायफलची रेंज महापालिकेच्या छत्रपती धर्मवीर संभाजीराजे रायफल नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात तयार केली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला असून ही शूटिंग रेंज वातानुकूलित आणि साऊंडप्रूफ आहे. कार्यक्रमाला कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट मॅन ऍन्ड वूमन रायफल असोसिएशनचे अध्यक्ष अजित खराडे, माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सचिन चव्हाण, प्रवीण लिमकर आदी उपस्थित होते. 

-संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com