रेडिरेकनर वाढल्याने पन्हाळा तालुक्यातील शेतीचे दर इतके वाढणार

 The increase in redireckoner will increase the rate of agriculture in Panhala taluka
The increase in redireckoner will increase the rate of agriculture in Panhala taluka

पन्हाळा, कोल्हापूर ः पन्हाळा तालुक्‍यात ग्रामीण भागातील शेतीचे दर 12 सप्टेंबर पासून गुंठयामागे सरासरी 200 ते 600 रुपयांनी वाढले आहेत. पन्हाळा तालुक्‍यात कोडोली, सातवे, बहिरेवाडी, कळे, यवलूज आणि पोर्ले तर्फ ठाणे ही मोठी गावे असून ती प्रभावक्षेत्रात आहेत. या गावातील गावठाण हददीतील दर प्रति चौरस मीटरला सरासरी 20 ते 30 रुपयांनी वाढले आहेत तर कळे येथील महामार्गाजवळील जमीनीचे दर 50 ते 70 रुपयांनी वाढले आहेत. 
मुद्रांक आणि नोंदणी विभाग हा शासनाला जास्तीत जास्त महसूल मिळवून देणारा विभाग आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या हातात पैसाच राहिला नाही, साहजिकच दस्तनोंदणींचे प्रमाण कमी झाले आणि शासनाला उत्पन्न एकदम कमी प्रमाणत आले, यावर उपाय म्हणून शासनाने मुद्रांक शुल्क निम्यावर आणले, जिल्हा परिषद कर कमी केला साहजिकच खरेदीविक्रीचे व्यवहार वाढण्यास सुरवात झाली. तीन ते चार वर्षात शासनाने रेडिरेकनरचे दर वाढवले नव्हते. हे दर 12 सप्टेबरपासून वाढविण्यात आले असून एकीकडे मुद्रांक शुल्कात कपात तर दुसरीकडे रेडिरेकनरच्या दरात वाढ करून सरकारने एका हाताने दिले आहे आणि दुसऱ्या हाताने काढून घेतल्याची भावना लोकांची आहे. 

सर्व्हरमुळे त्रास 
मुद्रांकशुल्क कमी झाल्यानंतर व्यवहार वाढले. पण त्याचवेळी सर्व्हर मिळेनासे झाल्याने जिल्हयात सर्वच ठिकाणी दस्त पेंडिंगचे प्रमाण वाढले, दुपार पर्यंत सर्व्हर मिळत असे, दुपार नंतर एकदमच गती कमी राहिल्याने एकेका दस्तासाठी पक्षकारांना दोन ते तीन दिवस फे-या मारण्याची वेळ आली, त्यातच 17 सप्टेंबरपासून बऱ्याच ठिकाणी जनता कर्फ्यु पुकारला गेल्याने दस्ताला जायचे की नाही याबाबतही संभ्रमावस्था निर्माण झाली. अर्थातच यामुळे मिळकत विकणाऱ्या बरोबरच घेणाऱ्यालाही बराच त्रास सोसावा लागतोय.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com