बैठ्या खेळांच्या साहित्य विक्रीत वाढ

Increase In Sales Of Indoor Sports Equipment Kolhapur Marathi News
Increase In Sales Of Indoor Sports Equipment Kolhapur Marathi News

कोल्हापूर : जिल्ह्यासह शहरात संचारबंदी असल्यामुळे प्रत्येकजण घरीच आहे. टाईमपाससाठी म्हणून बैठ्या खेळाच्या साहित्याच्या विक्रीत 50 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. याउलट मैदानी खेळाच्या साहित्याच्या विक्रीला ब्रेक लागला आहे. 

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर अनेकांनी घरी राहून वेळ घालवण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेत घरीच खेळण्यासाठी पसंती दिली आहे. यात कॅरम, बुद्धिबळ, लिडो, मोनोपॉली, सापशिडी यासह अन्य खेळ साहित्याच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अनेकांनी इनडोअर एअर बलून पूल, तसेच टबदेखील खरेदी केले आहेत. छोट्यांना घराच्या घरी जलतरणाचे धडे दिले जात आहेत. असे असले तरी प्रतिवर्षी विकले जाणारे मैदानी खेळाचे साहित्य विक्रीविना पडून आहे. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस व्हॉलीबॉल, बास्केटबॉल या साहित्याची मागणी घटली आहे. 

खरेदी 50 टक्‍क्‍यांनी वाढली
बंदमुळे अनेकांकडून बैठ्या खेळांनाच पसंती दिली जात आहे. अशा साहित्य खरेदीची मागणी होत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत ही खरेदी 50 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. सध्या बंद असल्यामुळे या साहित्याचा पुरवठा करणे शक्‍य नसले तरीही चौकशी होत आहे. 
- अजिंक्‍य गवळी, विक्रेता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com