आखाती देशात पिकविली भारतीय भाजी 

Indian Vegetables Grown In The Gulf Kolhapur Marathi News
Indian Vegetables Grown In The Gulf Kolhapur Marathi News

उत्तूर : भारतातील भाजी आखाती देशाच्या वाळवंटात पिकवण्याचा प्रयोग उत्तूर (ता. आजरा) येथील प्रकाश नावलकर यांनी यशस्वी केला आहे. मनात जिद्द आणि कष्ठ करण्याची तयारी असेल, तर एखादा युवक आपला छंद कसा जोपासतो याचे हे एक उदाहरण आहे. नावलकर यांचे काम कौतूकाचा विषय ठरला आहे. 

प्रकाश नावलकर यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण मुंबईला झाले. त्यानंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून ग्रॅंड हयात या फाईव्ह स्टार हॉंटेलमधे नोकरी मिळवली. पुढे त्यांची बदली हॉंगकॉंगला झाली. तेथून पुढे आबुदाबि, मग दुबईला नंतर मुंबईला परत दोहाकतारला आता कतार नॅंशनल लायब्ररीमधे आशिस्टन वेअर हाऊस या पदावर ते काम करतात. 

नावलकर यांचे बालपण शेतकरी कुटूंबात झाले. यामुळे त्यांना दोहाकतारमध्ये भाजी पिकवण्याची संकल्पना सुचली. त्यांनी आपली कल्पना कॅंप मॅनेंजरना समजावून सांगितली. ते अलिबागचे असल्याने त्यांना ही कल्पना आवडली. आज अरब देशात पेट्रोल, डिझेल, गॅस एकदम स्वस्त मिळते, पण पाणी अजिबात नाही. नावलकर आबुदाबिला असताना पाण्याचे नियोजन कसे करायचे ते शिकले होते. ते त्यांना येथे शेती करायला उपयोगी पडले. 

बांगलादेशी दोन मित्र आणि फिलिपिनो एक यांच्या मदतीने त्यांनी शेती करायचे ठरविले. एक वाफा तयार केला. बाथरूम, वॉशबेसनच वेस्टेज पाणी व प्रत्येक रूमला एक एक एअरकंडीशन आहे त्याचे पाणी पाईप लाईनने वाफ्याला दिले. पहिले पिक कोथिंबीरीचे घ्यायचे ठरविले. तिसऱ्या दिवशी सकाळी वाफात पाणी मारून धन्याची लावण केली. उगवण आणि पिक चांगले आले. तसे आजुबाजुच्या बॅरिकेट मधील राहनारे रूम जवळचा वाफा पाहायला आले,त्या लोकांनाही यांच्या विषयी माहिती दिली. 

वाळुचे कण रगडीता...
कॅंपमधे आमचा वाफा पाहून जवळजवळ सगळीकडेच अशा पद्धतीने वाफे तयार करून भेंडी, वांगी, मेथी, कलींगड, काकडी, कारले, पडवळ अशा प्रकारे भाज्या घेत आहेत. काही ठिकाणी फुल झाडे ही लावली आहेत, तर काहींनी तुळशीची झाडे लावली. वाळुचे कण रगडीता तेल ही गळे याचा प्रत्यंतर मला आला 
- प्रकाश नावलकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com