एसटीला तीन हजार कोटींच्या मदतीची इंटकची मागणी

शिवाजी यादव
Monday, 21 September 2020

कोल्हापूर ः कोरोनालॉकडाउन काळात एसटी महामंडळाचे अर्थिक नुकसान झाले. त्याची भरपाई म्हणून राज्य शासनाने एसटी महामंडळाला तीन हजार कोटी रूपये द्यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) तर्फे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना देण्यात आले. 

कोल्हापूर ः कोरोनालॉकडाउन काळात एसटी महामंडळाचे अर्थिक नुकसान झाले. त्याची भरपाई म्हणून राज्य शासनाने एसटी महामंडळाला तीन हजार कोटी रूपये द्यावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) तर्फे परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना देण्यात आले. 
कोरोना लॉकडाउन काळात एसटी महामंडळाची प्रवासी सेवा 154 दिवस बंद राहीली. त्यामुळे रोज 22 कोटी रूपयांचे अर्थिक नुकसान एसटी महामंडळाला सोसावे लागले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होणेही मुश्‍कील झाले. गेल्या महिन्यात 50 टक्के आसनक्षमतेवर एसटीची प्रवासी सेवा सुरू झाली. मात्र त्यालाही जेमतेम प्रतिसाद लाभला, अशात एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे पगार, इंधन खर्च, गाड्यांची दुरूस्ती असे खर्च आहेत. अशात एसटीचा संचित तोटा 6 हजार कोटींवर गेला आहे. 
एसटी महामंडळ हा राज्य शासनाचा अंगीकृत प्रकल्प आहे. त्यामुळे राज्यातील प्रवाशांना सक्षम प्रवासी सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाला अर्थिक बळ देणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासनाने 3 हजार कोटी रूपयांची अर्थिक मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी या निवेदनात केली आहे. इंटकचे जिल्हाध्यक्ष आप्पा साळोखे यांच्या शिष्ठमंडळाने हे निवेदन दिले. 

निवेदनातील मागण्या अशा ः 
-जुलै, ऑगस्ट महिन्यांचे वेतन तातडीने द्यावे 
-3 टक्के वेतन वाढ व घरभाडे भत्ता द्यावा, सक्तीची रजा कपात निर्णय रद्द करा 
- कोरोना काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना 300 रूपये भत्ता द्यावा 
- माल वाहतूक करणाऱ्या वाहकांना चार दिवसानंतर बदली चालक द्यावा. 
- मोटर वाहन कर माफ करावा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Intake's demand of Rs 3,000 crore for ST