पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी ग्रामपंचायतीला आय.एस.ओ.मानांकन...

ISO certification for Vekhandwadi Gram Panchayat in Panhala t
ISO certification for Vekhandwadi Gram Panchayat in Panhala t

आपटी - पन्हाळा तालुक्यात सलग दोन पंचवार्षिक बिनविरोध झालेल्या वेखंडवाडी ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. ९००१:२०१५ हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. या ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्पांतर्गत आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत १ ते ३३ नमुन्यातील सर्व नोंदी संगणीकृत करून कागदविरहित (पेपरलेस) कामकाज चालू केले आहे.त्यामुळे ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून मिळणारे सर्वप्रकारचे दाखले संगणकीकृत प्रतीत वितरीत केले जातात.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही मोजक्याच ग्रामपंचायती आय.एस.ओ. मानांकन प्राप्त आहेत.पन्हाळा बांधारी परिसरात आय.एस.ओ मानांकन मिळवणारी पहिली ग्रामपंचायत होण्याचा मान वेखंडवाडी ग्रामपंचायतीला मिळाला आहे.

पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेखंडवाडी ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम राबविले आहेत.त्यामध्ये ग्रामपंचायती मार्फत केलेली विकास कामे,गावातील स्वच्छता,प्लॅस्टिक निर्मुलन,जण जागृती साठी आयोजित केलेली विविध शिबिरे व व्याख्याने, युवकांसाठीचे खुली व्यायामशाळा,ग्रामदैवतेच्या यात्रेचे नियोजन, वृक्षारोपण, विविध प्रकारचे सामाजिक-आरोग्यविषयक-शैक्षणिक उपक्रम.याच बरोबर ग्रामपंचायतचे सुसज्ज कार्यालय,ग्रामपंचायतीत चालणारे दैनंदिन कामकाज,कर वसुली,ग्रामपंचायती कडून नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सोयी सुविधा,लोकांना माहिती पुरवण्यासाठी वापरली जाणारी एस.एम.एस सुविधा यासर्व बाबी वेखंडवाडी ग्रामपंचायतीला आय.एस.ओ. ९००१,२०१५ हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवण्यात उपयोगी ठरल्या.

या मानांकनामुळे तालुका व जिल्हा पातळीवर ग्रामपंचायतीला नावलौकिक प्राप्त झाला आहे.आय.एस.ओ मानांकन मिळवणारी पहिली ग्रामपंचायत होण्याचा मान आमच्या ग्रामपंचायतीला मिळाला हे गावासाठी अभिमानास्पद आहे. या मानांकनासाठी गावातील सर्व नागरिकांचे बहुमोल सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व भविष्यात देखील असेच सहकार्य मिळावे ही अपेक्षा आहे.
     -  सौ. शुभांगी कंदूरक -  सरपंच

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com