कोल्हापुरात पाऊस आला, बळीराजा खूश झाला

सुनील पाटील
बुधवार, 15 जुलै 2020

धरणांमधील पाणीसाठा संतुलित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार राधानगरी धरणातून एक हजार 450 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. तर, अलमट्टी धरणातूनही तब्बल 46 हजार 130 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली आहेत. 

कोल्हापूर : जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दुपारपासून दमदार सुरवात केली. त्यामुळे सर्वच घटकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. रात्री दहानंतर राधानगरी, गगनबावडा, करवीर तालुक्‍यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. 
दरम्यान, धरणांमधील पाणीसाठा संतुलित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार राधानगरी धरणातून एक हजार 450 क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. तर, अलमट्टी धरणातूनही तब्बल 46 हजार 130 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली आहेत. 
जिल्ह्यात पावसाने आज काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भात, भुईमूग व इतर कडधान्यांना हा पाऊस पोषक आणि पीकवाढीस आवश्‍यक ठरेल. धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे. गेल्या वर्षीच्या महापुराच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच धरणांतील पाणीसाठा संतुलित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यामुळे नदीची पातळी काही प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी 16.7 फुटांपर्यंत आहे. तर, पंचगंगा नदीवरील रुई व इचलकरंजी, भोगावती नदीवरील खडक कोगे, दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

शेतकऱ्यांना दिलासा 
जिल्ह्यात कधी मोठा पाऊस, तर कधी कडकडीत ऊन अशी स्थिती आहे. असे वातावरण ऊसवाढीसाठी पोषक असून, भात, भुईमूग व सोयाबीन अशा पिकांना मारक ठरणारे आहे. त्यांची उगवण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे, आज झालेला पाऊस शेतकऱ्यांना आणि पिकांना दिलासा देणार आहे. 

बंधाऱ्याचीं पाणी पातळी : 
राजाराम 16.3 फूट, सुर्वे 18.2 फूट, रुई 44.3 फूट, इचलकरंजी 41 फूट, तेरवाड 39.6 फूट, शिरोळ 31. 6 फूट, नृसिंहवाडी 26 फूट, राजापूर 16 फूट. 

जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दुपारपासून दमदार सुरवात केली. त्यामुळे सर्वच घटकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. रात्री दहानंतर राधानगरी, गगनबावडा, करवीर तालुक्‍यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. 

संपादन - यशवंत केसरकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It rained in Kolhapur, Baliraja was happy