esakal | कोरोनामुळे कुटुंबीयांशी दूर असलेल्या बंदिजनांची अशी होणार भेट
sakal

बोलून बातमी शोधा

jail Relatives to meet detainees via VC District Legal Services Authority office

विधी व सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

कोरोनामुळे कुटुंबीयांशी दूर असलेल्या बंदिजनांची अशी होणार भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनामुळे कुटुंबीयांची भेट झालेली नाही. लवकरच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नातेवाईकांना भेट करून देणार असल्याची माहिती विधी सेवाचे सचिव न्यायाधीश पंकज देशपांडे आज कारागृहात दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि कळंबा येथील मध्यवर्ती कारागृहातर्फे आज महिला बंदी भगिनींना मार्गदर्शन करण्यात आले.


हेही वाचा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजीव आवळे करणार राष्ट्रवादी  प्रवेश -

सचिव देशपांडे म्हणाले, ‘‘मार्चपासून कोरोनाचा विळखा आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह बंदीजनांनाही त्रास सहन करावा लागला आहे. 


लॉकडाउनच्या काळात महिलांना कुटुंबीयांना भेटता आले नाही. लवकरच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा उपक्रम राबविला जाणार 
आहे.’’ॲड. योगिता हर्णे यांना बंदीच्या अधिकाराबाबत माहिती दिली. सहा वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना त्यांच्या बंदी महिलेकडे (आईकडे) राहण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच, महिला सबलीकरणाबाबत ॲड. शुभांगी निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनीही मार्गदर्शन केले.

संपादन - अर्चना बनगे

go to top