Breaking : जयसिंगपुरात वृद्ध पॉझिटीव्ह, हॉस्पीटल सील, डॉक्‍टरसह 9 जण क्वारंटाईन 

In Jaisingpur, elderly positive, hospital seal
In Jaisingpur, elderly positive, hospital seal

जयसिंगपूर : शहरातील दहाव्या गल्लीतील वृद्ध कोरोना पॉझिटीव्ह आल्याने प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्‍टरसह नऊ जणांचे स्वॅब शुक्रवारी तपासणीसाठी घेण्यात आले. नेहरु रोडवरील हॉस्पिटलही सील करण्यात आले असून डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. 


दहाव्या गल्लीतील वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालिका प्रशासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संबंधित वृद्धावर प्राथमिक उपचार केलेल्या डॉक्‍टरसह कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले होते. वृद्धाच्या कुटुंबियांचे गुरुवारी रात्री स्वॅब तपासणीस घेण्यात आल्यानंतर शुक्रवारी डॉक्‍टरसह नऊ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. 

नेहरु रोडवरील एक हॉस्पिटलही सुरक्षिततेच्या कारणावरुन सील करण्यात आले असून हॉस्पिटलमधील रुग्णांमधूनही घबराट निर्माण झाली होती. नातेवाईकांनी डिस्चार्जची मागणी केल्यानंतर रुग्णांना तातडीने डिस्चार्ज देण्यात आला.

डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांना गुरुवारपासून हॉस्पिटलमध्येच क्वॉरंटाईन करण्यात आले असून हॉस्पिटलही प्रशासनाने सील केले आहे. कोरोनाचा रुग्ण आढळलेल्या वृद्धाच्या कुटुंबियांसह डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांच्या स्वॅब रिपोर्टकडे लक्ष लागून राहिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com