...तर उग्र आंदोलन छेडू, गडहिंग्लजला "या' संघटनेने दिली इशारा... तीन महिन्यांची वीज बिले माफ करण्याची मागणी

Janata Dal Demands Waiver Of Three-Month Electricity Bill Kolhapur Marathi News
Janata Dal Demands Waiver Of Three-Month Electricity Bill Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : जनता दलाने वाढीव वीज बिलाचा प्रश्‍न लावून धरला आहे. यापूर्वी वीज बिलांची होळी करून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. आज धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले. माजी आमदार ऍड. श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. घरगुती वीज ग्राहकांची गेल्या तीन महिन्यांची वीज बिले माफ करण्याची मागणी केली. वीज बील माफ झाले नाही, तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला. 

महावितरणने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले ग्राहकांना दिली. पण, बिलांचा आकडा पाहून त्याविरोधात सर्वत्र संताप उमटला. 13 जुलै रोजी जनता दलाने प्रांत कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून निषेध केला होता. त्यानंतरही वीज बिले माफ करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यामुळे आज धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात इरिगेश फेडरेशन व समविचारी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनीही सहभाग घेतला. 

सकाळी साडेअकराला आंदोलनाला सुरवात झाली. वाढीव बिले माफ करा, आमच्या मागण्या मान्य करा... आदी घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले. 300 युनीटच्या आत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांचे वीज बिल माफ करावे, ग्राहकांच्या या रक्कमेची भरपाई राज्य शासनाने करावी. राज्य शासनानेवीज ग्राहकांना वीज बिलात 20 ते 30 टक्के सवलत जाहीर केली आहे. पण, ही तुकडी सवलत वीज ग्राहकांना मान्य नाही. उलट कोरोनाच्या संकटात दु:खावर मीठ चोळणारी आहे. वीज बील माफ झाले नाही, तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला. 

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे, नगरसेवक उदय कदम, क्रांती शिवणे, नाज खलिफा, सुनीता पाटील, राम मजगी, दत्ता मगदूम, कृष्णा परिट, रमेश मगदूम, हिंदुराव नौकुडकर, युवा तालुकाध्यक्ष मालतेश पाटील, शशिकांत चोथे, रामगोंडो पाटील, राजू जाधव, जयंत पाटील उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com