जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्याकडून शुभेच्छाच....

Jayant Patil comment on Devendra Fadnavis in kolhapur
Jayant Patil comment on Devendra Fadnavis in kolhapur

कोल्हापूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असं जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते किंवा माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, असं भाकीत संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

पुढे ते म्हणाले, आमचं सरकार व्यवस्थित चालू आहे. कोणतीही धुसफूस नाही, आम्ही  मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे  यांच्या  नेत्तृवात  काम  करत आहे. सीएए, एनआरसी याबाबत मी बोलणं योग्य ठरणार नाही. उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. आम्ही याबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे.

ब्राह्मण अधिवेशनाला जयंत पाटील यांची उपस्थिती

दरम्यान, आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेच्यावतीने कोल्हापुरात दोन दिवसीय ब्राह्मण अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या अधिवेशनाला सुरुवात झाली.

 दुसऱ्या समाजाचा व्देष करून स्वतःच्या समाजाचे पुढारपण करणे, हा एक मोठा गैरसमज आहे. प्रत्येक समाजाने आपल्या समाजातील तळागाळातील माणसाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पुढे मंत्री जयंत पाटील म्हणाले, "ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन परिषदेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. तळागाळातील माणसाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक समाजाने प्रयत्न केले पाहिजेत. मराठा समाजाने मध्यंतरी मोठे आंदोलन उभारले. त्यामागेही तोच उद्देश होता. सर्वच समाजाचे काही ना काही प्रश्‍न आहेत. अल्पसंख्यांक दर्जाबरोबरच ब्राम्हण समाजाच्याही काही मागण्या आहेत. त्या मागण्यांबाबत सरकार निश्‍चितच सकारात्मक प्रयत्न करेल. वेबसाईटच्या माध्यमातून ब्राम्हण समाजाने प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करावे आणि त्यातून जे काही प्रश्‍न दिसतील ते शासनाकडे सादर करावेत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com