तरुण मोटरसायकलवरून आला आणि पोलिस ठाण्यासमोरच त्याने केले विषारी औषध प्राशन

jaysingpur case  Attempted self immolation of youth
jaysingpur case Attempted self immolation of youth

जयसिंगपूर(कोल्हापूर) : पत्नी नांदण्यास येत नसल्याच्या कारणातून तरुणाने जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोरच विषारी औषधप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.काल  दुपारी ही घटना घडली. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांची धावपळ उडाली. तरुणाला तातडीने सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.


पत्नी नांदण्यास येत नसल्याने मच्छी मार्केटमधील तरुणाने आत्मदहनाचा इशारा दिला होता. इचलकरंजीतील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठाण्यासमोर दक्षता घेतली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास तरुण विषारी औषध घेऊनच आला. औषध प्राशन केल्यानंतरयाची माहिती मिळताच पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. येथील मच्छी मार्केटच्या परिसरात राहात असलेल्या युवकाचा याचे सहा महिन्यांपूर्वी तरुणीशी प्रेम विवाह झाला होता. दोघांमध्ये वांरवार किरकोळ वाद होत असल्याने पत्नीने पोलिसांकडे कैफियत मांडली होती. 

दरम्यान, पोलिसांत वाद न मिटल्याने विवाहित मुलगी माहेरी गेली होती. ती पुन्हा नांदायला यायला तयार नसल्यामुळे हवालदिल झालेल्या युवकाने आज सकाळी पोलिस ठाण्यामध्ये येऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.पोलिसांनी ठाण्याच्या आवारामध्ये रुग्णवाहिका व एक फायर फायटर तसेच कर्मचारी तैनात केले होते. तरुण मोटरसायकलवरून आल्यानंतर त्याने औषध प्राशन केले. १०८ च्या रुग्णवाहिकेतून सांगली येथील सिव्हील रुग्णालयात दाखल केले.

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com