कोरोना तपासणीच्या भीतीपोटी त्यांनी घेतली चौथ्या मजल्यावरुन उडी अन्...

jumped from the fourth floor Fearing covid test
jumped from the fourth floor Fearing covid test

बेळगाव - कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्याच्या भीतीने 72 वर्षीय वृध्दाने शहरातील एका नामाकिंत खासगी इस्पीतळाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेउन आत्महत्या केली. विष्णू धनाजी पाटील (वय 72, रा. गणराज कॉलणी वडगाव) असे त्याचे नाव असून शुक्रवार (ता.7) सकाळी ही घटना घडली. या घटनेची नोंद एपीएमसी पोलीस ठाण्यात झाली आहे. 

याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, विष्णू यांना गेल्या काही दिवसापासून पोटदुखीचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे बुधवार (ता.5) रोजी त्यांना नेहरुनगर येथील एका खासगी इस्पीतळात दाखल करण्यात आले होते. ते संशयित कोरोना रुग्ण असल्याने त्यांना चौथ्या मजल्यावरील वार्ड मध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना तपासणीसाठी आज सकाळी त्यांच्या घशातील स्वॅब घेण्यात येणार होता. ही बाब विष्णू यांच्या लक्षात घेताच त्यांनी केवळ भीतीपोटी आज सकाळी 6.20 च्या सुमारास रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत मृत्यूला कवटाळले.

घटना घडताच इस्पीतळ परिसरात एकच धावपळ उडाली. रुग्णाने आत्महत्या केल्याची माहिती समजताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. शल्यचिकित्सा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

संपादन - मतीन शेख
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com