esakal | नवरात्रोत्सवात गजबजणारा जोतिबा डोंगर आज रविवारीही सुनासुनाच
sakal

बोलून बातमी शोधा

jyotiba temple area silent mode in navratri festival not entry for people in kolhapur

मात्र जोतिबा डोंगराच्या बोहर येण्या जाण्याच्या मार्गावर पोलीसांनी नाकाबंदी केल्यामुळे भाविकांना प्रवेश दिला नाही. 

नवरात्रोत्सवात गजबजणारा जोतिबा डोंगर आज रविवारीही सुनासुनाच

sakal_logo
By
निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर दरवर्षी नवरात्र काळात जोतिबा देवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. पण यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे जोतिबा डोंगरावर येण्यासाठी भाविकांना बंदी घातल्यामुळे नवरात्रात गजबजणारा जोतिबा डोंगर आज रविवार असूनही शांतच होता. डोंगरावर बंदोबस्तासाठी असणारे पोलीस ठिकठिकाणी दिसत होते. मात्र जोतिबा डोंगराच्या बोहर येण्या जाण्याच्या मार्गावर पोलीसांनी नाकाबंदी केल्यामुळे भाविकांना प्रवेश दिला नाही. 

हेही वाचा - दिलासादायक : कोल्हापुरात ९४ टक्के बेड रिकामे ; ४४४ जण कोरोनामुक्‍त -

डोंगरावर दरवर्षी समईत तेल घालून कडाकण्यांचा नैवद्य देण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक येतात. यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होते, पण यंदा मात्र कोरोनामुळे आर्थिक उलाढाल थंडावली. चैत्र यात्रेपासून डोंगरावरील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. नवरात्र उत्सवात तरी  मंदिर खुले होतील अशी त्यांची अशा सगळ्यांना होती पण प्रशासनाने संसर्ग वाढण्याचा धोक असल्याने नवरात्र उत्सवासही बंदी घातली. 

हेही वाचा - शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागा बद्दल प्रश्‍नचिन्ह : सामान्यज्ञानावर प्रश्‍न कसे? -

दरम्यान आज नवरात्र उत्सवातील दुसऱ्या दिवशी ज्योतिबा देवाची तीन पाकळी सोहन कमलपुष्प तील महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा समस्त दहा गावकरी आणि पुजारी वर्गानी बांधली. मंदिरात सकाळी धुपारती सोहळा झाला. सकाळी दहा वाजता तो मुळमाया श्री. यमाई  मंदिराकडे गेला. या ठिकाणी विविध धार्मिक विधी झाले. ग्रामस्थांनी घरातूनच या सोहळ्याचे दर्शन घेतले. 

संपादन - स्नेहल कदम 

go to top