'स्वच्छ भारत'ची एैशीतैशी ; कारागृहाचे सांडपाणी थेट उघड्यावर 

Prison sewage directly in the open
Prison sewage directly in the open

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे सांडपाणी कारागृहाच्या पिछाडीस असणाऱ्या मोकळ्या जागेत सोडले आहे. येथे एक खंदक असून त्यातून हे पाणी वाहात ओढ्यात जाते. मात्र या परिसरात राहाणाऱ्या नागरिकांना या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात दुर्गंधी पसरते, डास होतात. यामुळे नागरिकांचे आरोग्यास धोका उद्‌भवण्याची शक्‍यता आहे. 

कारागृहासारख्या शासकीय इमारतीमधील सांडपाणी उघड्यावर सोडणे हे स्वच्छ भारत अभियान आणि शासकीय स्तरावर त्याची अंमलबजावणी यातील विसंगती दर्शवते. कळंबा कारागृह जेव्हा बांधले गेले त्यावेळी हा परिसर म्हणजे मोकळा माळ होता. त्यामुळे कारागृहाचे सांडपाणी थेट पाठीमागच्या ओढ्यात सोडले होते. कारागृहातील कैदी बाहेर जाऊ नये आणि कारागृहाची हद्द लक्षात यावी यासाठी पाठी मागच्या बाजूला एक छोटा खंदक आहे. कारागृहातील सांडपाणी नैसिर्गीक उताराने पाठीमागच्या बाजूला येते. येथे ते साठते व खंदाकातून पुढे ओढ्याला मिळते. 

काळाच्या ओघात कारागृहाच्या मागे उपनगरे वसली. येथे अभिनव कॉलनी, अपूर्वा नगर व अन्य छोट्या कॉलनी आहेत. या सांडपाण्यामुळे या परिसरात डास वाढले आहेत. दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी, आजुबाजूला असणारी झाडे आणि खंदकातील गवत यामुळे येथे सापही वाढले आहेत. आसपासच्या घरामध्ये साप येण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होते. यंदा महापालिकेने या खंदाकातील झुडपे काढून खोली वाढवली आहे. एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान राबवत आहे आणि दुसरीकडे कारागृहातील सांडपाणीच उघड्यावर सोडले आहे. हे शासकीय धोरणातील विसंगती दर्शवते. 

कुंपणाची गरज... 
कळंबा कारागृहाच्या पिछाडीस बंदीजन शेती करतात. शेतीच्या कामासाठी इथे कैदी येतात. एक खंदा ओलांडला की त्यांना पळून जाता येते. एक कैदी येथूनच पळून जाण्याची घटनाही येथे घडली आहे. कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही येथे कुंपण होणे आवश्‍यक आहे. 

दृष्टिक्षेप 
- कारागृहाच्या मागे मोकळ्या जागेत सोडले जाते सांडपाणी 
- परिसरातील राहणाऱ्या वस्तीत दुर्गंधी 
- झाडे आणि खंदकातील गवतामुळे सापांचे प्रमाण वाढले 
- पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट बनते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com