कर्नाटक कनेक्‍शनचा इचलकरंजीला धोका 

पंडित कोंडेकर
Thursday, 28 May 2020

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी गावांना मुंबई अथवा पुणे कनेक्‍शनचा धोका वाढला आहे; पण इचलकरंजीला मात्र कर्नाटक कनेक्‍शनचा धोका वाढत असून अनेकजण प्रवासाचा परवाना नसताना शहरात दाखल होत आहेत. अशा नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असल्याची माहिती आयजीएम रुग्णालयातून देण्यात आली. 

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी गावांना मुंबई अथवा पुणे कनेक्‍शनचा धोका वाढला आहे; पण इचलकरंजीला मात्र कर्नाटक कनेक्‍शनचा धोका वाढत असून अनेकजण प्रवासाचा परवाना नसताना शहरात दाखल होत आहेत. अशा नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात येत असल्याची माहिती आयजीएम रुग्णालयातून देण्यात आली. 

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई व पुणे कनेक्‍शनमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तुलनेने अद्याप या दोन्ही शहरांच्या कनेक्‍शनचा संबंध आलेला नाही. नुकतेच पॉझिटिव्ह आलेले तीन रुग्ण हे सोलापूर रिटर्न होते. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कर्नाटकातून प्रवासाचा परवाना नसताना शहरात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास परवानगीची गरज नाही. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या वाहनांनी पंचगंगा नदीच्या पलीकडे असलेल्या शिरदवाड हद्दीत येत आहेत. तेथून चालत शहरात दाखल होत आहेत. 

आयजीएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आल्यानंतर हा गंभीर प्रकार समोर येत आहे. अनेकांकडे प्रवासाची परवानगीच नाही. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना दिली जात आहे. शहरात कर्नाटकातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता वाढत आहे. कर्नाटकातील अनेक भागात कोरोनाच कहर आहे. जर बाधित क्षेत्रातून आल्यास संसर्गाचा मोठा धोका आहे. अशा परिस्थीतीत अधिक जागरुकता राखण्याची गरज आहे. 

रुग्णालयांकडून सतर्कता 
कर्नाटकातून आलेले नागरिक वैद्यकीय तपासणीसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना खबरदारी म्हणून थेटे संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविण्यात येत आहे, असे आयजीएम रुग्णालयातून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka Connection Threatens Ichalkaranji Kolhapur Marathi News