यंदाचा क्रिक्रेट हंगाम होणार पूर्ण ;  "केडीसीए'  स्पर्धेचे बॅकलॉग काढणार भरून 

kDCA efforts to complete the cricket tournament season sports marathi news
kDCA efforts to complete the cricket tournament season sports marathi news

कोल्हापूर : कोरोनाच्या महासंकटातून मुक्त होत स्पर्धा सुरू होताना गत वर्षीच्या अनेक स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान पेलत यंदाचा क्रिक्रेट स्पर्धांचा हंगाम पूर्ण करण्यासाठी "केडीसीए'चे प्रयत्न सुरू आहेत. गत वर्षीच्या अ गटासह क गटाच्या स्पर्धा घेणे व निमंत्रितांच्या एमसीएच्या स्पर्धांसह विविध पुरस्कृत स्पर्धा घेऊन खेळाडूंचे नुकसान टाळण्याच्या उद्देशाने हा हंगाम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. 


कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने कोरोनामुळे विस्कटलेली स्पर्धांची घडी पुन्हा बसवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. 
गत हंगामातील स्पर्धांसह यंदाच्या वर्षातील हंगामाचे सर्व सामने पूर्ण करून खेळाडूंचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सुनियोजित कार्यक्रमाची आखणी केली आहे. या आधारावरच यंदाच्या हंगामातील तब्बल 100 हून अधिक तर गत हंगामातील सामने खेळवले जाणार आहेत. "केडीसीए'कडे नोंदणी असणाऱ्या संघांसाठी संस्थेतर्फे खेळवलेल्या विविध सामन्यांचे अधिक महत्त्व असते.

हंगामात विविध वयोगटासह तब्बल 34 संघ विविध स्पर्धांत एकमेकांशी भिडतात. कोरोनामुळे रद्द झालेले सामने पूर्ण करण्यासाठी यंदाच्या हंगामातील स्पर्धा आणि गतवर्षीच्या स्पर्धा या विभागावर पद्धतीने घेतल्या जातात. सोबतच एमसीएच्या निमंत्रितांच्या स्पर्धा, अनेक पुरस्कृत स्पर्धा, लीग स्पर्धा, नॉकआऊट स्पर्धा, महिलांचे विविध सामने हे पूर्ण करण्याचे आव्हान पूर्ण केले जात आहे. एका हंगामातील सामने पूर्ण करतानाच नाकीनऊ येत असताना दोन हंगाम एकाच वेळेला पूर्ण करण्याची कसरत सध्या "केडीसीए' करत आहे. 

दृष्टिक्षेपात 
*अ, ब, क गटातील संघ . 
*हंगामात 100 सामने . 
* हंगामात 20 हून अधिक विविध स्पर्धा 
*32 संघांची नोंदणी. 
*14,16,19,25 वर्षाचे वयोगट. 

दोन हंगामाचे सामने एकाच हंगामात पूर्ण करणे हे खेळाडूंच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. संघ व्यवस्थापक आणि केडीसीएच्या पदाधिकाऱ्यांत व्यापक चर्चेनंतरच हे नियोजन तयार केले आहे. सुसूत्रता असणाऱ्या या नियोजनामुळे संघांवर आणि खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचे दडपण येत नाही, हेच नियोजनाचे यश म्हणावे लागेल. 
- केदार गयावळ, सेक्रेटरी, केडीसीए.  

संपादन-अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com