मोबाईलची झाली रिंग; शंभरहून अधिक मिस्डकॉल पण

Khanapur incident Two youths drowned in Halatri Nala
Khanapur incident Two youths drowned in Halatri Nala

खानापूर : शहरापासून तीन किमी अंतरावरील हलात्री नाल्यात शहरातील दोन तरुण बुडाल्याची शक्‍यता असून रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. अरफत शाकीदअली आरकट्टी (वय 16, रा. जळकावाडा, खानापूर) आणि उमेर मुस्ताक खलिफा (वय 16, रा.बाजारपेठ, खानापूर) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघे पोहण्यासाठी हलात्री-मलप्रभा संगमाच्या ठिकाणी गेले असताना ही घटना घडली आहे. 


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की,

अरफत आणि उमेर हे अन्य एका मित्रासमवेत दुचाकीवरून शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास हलात्री नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, एकाच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तो अर्ध्यातून परत आला होता. तर अरफत आणि उमेर हे शनिवारी रात्री उशिरापर्यंत परतलेच नाहीत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण आज दिवसभरात त्यांचा कुठेही शोध लागला नाही. दरम्यान, त्यांच्यासोबत गेलेल्या व अर्ध्यावरून परतलेल्या मित्राने ते हलात्रीला पोहण्यासाठी गेल्याचे सांगितले. दोघांच्याही कुटुंबियांनी हलात्रीच्या काठावरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हलात्री-मलप्रभेच्या संगमाजवळ एका ठिकाणी काठावर त्या दोघांचे कपडे आणि मोबाईल आढळले. त्यावरून ते पाण्यात बुडाल्याची खात्री झाली. 


तत्काळ पोलिसांना या घटनेची कल्पना दिल्यानंतर रविवारी सायंकाळी अग्निशामक दलाच्या सहाय्याने त्यांचा हलात्री नाल्यात शोध घेतला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचे मृतदेह आढळले नाहीत. नाल्यातील कोंडीत भरपूर पाणी असल्याने शोधकार्यात व्यत्यय येत होता. तसेच अंधारामुळे आज शोधकार्य थांबविले. दरम्यान, ते दोघे त्या ठिकाणी पोहण्यासाठी गेल्याची खात्री झाली आहे. तसेच त्यांच्या काठावरील कपड्यांचीही शहानिशा झाली असल्याने ते दोघे बुडाल्याची शक्‍यता आहे. सोमवारी (ता. 16) पुन्हा शोधकार्य हाती घेण्यात येणार असल्याचे पोलिस आणि अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा- हाताच्या बोटांची कोड लँग्वेज लय भारी!

मोबाईलची रिंग होत असतानाही... 
अरफत आणि उमेर हे दोघेही अकरावीला होते. कॉलेज सुरु नसल्याने ते कंटाळल्याचे घरातल्यांना सांगत होते. अरफतच्या वडिलांचे गॅरेज आहे, तर उमेरचे वडील किराणा दुकान चालवितात. ते शनिवारी दुपारनंतर घरी आले नसल्याने त्यांच्या मोबाईलवर बहुतेकांनी कॉल केले, पण दोघांनीही कुणाचेच कॉल घेतले नाहीत. आज ते दोन्ही मोबाईल हलात्रीच्या काठावर आढळले. त्यावर सुमारे शंभरहून अधिक मिस्डकॉल होते. 

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com