पतंगाचा मांजा पक्ष्यांच्या जीवावर

Kite caterpillars on birds
Kite caterpillars on birds

कोल्हापूर : मांजाने अनेक जण जखमी होण्याचे प्रकार सुरूच असताना हाच मांजा आता पक्ष्यांच्या जीवावर उठला आहे. मागील तीन दिवसात दोन घार जखमी झाल्या तर अनेक पक्षांचा बळी गेला आहे. जखमी घारींवर पांजरपोळ येथे डॉ. राजकुमार बागल उपचार करत आहेत. 
मोकळ्या मैदानावर रंगणाऱ्या खेळाने आता घराचे टेरेस व्यापले आहेत. झाडामध्ये अडकणारे पतंगाचे दोरे आता मोबाईलच्या टॉवर वर अडकत आहेत. आधी वापरला जाणारा मांजा जास्त जोर लावल्यास तुटत असे; पण सध्या वापरत येणारा चायनीज मांजा मात्र सहजा सहजी तूटत नाही. हाच मांजा माणसांरोबरच आता पक्ष्यांच्या जीवावरही उठला आहे. पतंग तुटून गेल्यानंतर त्याचा मांजा हा मोबाईलचे टॉवर, लाईटचे खांब, झाडावर अडकेला पाहायला मिळतो. हा मांजा सहजासहजी नजरेस पडत नसल्यामुळे अनेक वेळा त्याचे शिकार व्हावे लागते. उंच टॉवरवर अडकलेल्या मांजामुळे घार जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे, तर आणखी एक घार झाडातून उडताना मांजात अडकून जखमी झाली. अशा या दोन्ही जखमी घारींवर पांजरपोळ येथे डॉ. बागल हे उपचार करत असून, एका घारीची प्रकृती गंभीर आहे. या घरीचा संपूर्ण पंख तुटला आहे. काही जणांचा होणार हा खेळ पशुपक्षांबरोबरच माणसाच्या जीवावर उठला आहे. या मुळे चायनीज मांजावर बंदी असताना विक्री करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 


पारंपरिक पद्धतीचा दोरा नाशवंत
या पूर्वी पारंपरिक पद्धतीचा वापरला जाणारा दोरा हा नाशवंत होता. अधिक जोरात खेचल्यास सहज तुटत असे. यामुळे जखमी होण्याचे प्रकार कमी असायचे. मात्र, सध्या वापरात असणारा चायनीज मांजा हा तुटत नाही. यामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्‍यता वाढली आहे. शिवाय हा दोरा ऊन-वारा-पाऊस या मुळे खराबही होत नाही. 

या मांजावर बंदी असली तरीही त्याची विक्री होतेच आणि कोणाचा तरी  यामुळे जीव जातो. त्यामुळेच जीवघेणा हा मांजा अजून किती जणांना जखमी करून त्यांचे जीव घेणार? 
-डॉ. राजकुमार बागल 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com