कोल्हापुरात 20 पटाच्या आतील 448 शाळा

Kolhapur  448 schools within 20 patas
Kolhapur 448 schools within 20 patas

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सुमारे 1800 प्राथमिक शाळा आहे. यातील शंभर, दोनशे नव्हे तर चक्‍क 448 शाळा या 20 पटाच्या आतील आहेत. यातही डोंगरी भागातील शाळांची संख्या लक्षणीय आहे. दरवर्षी 20 पटाच्या आतील शाळांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला या पट गळतीची नेमकी कारणे शोधणे व त्यावर उपाय शोधण्यासाठी नेमकेपणाने काम करावे लागणार आहे. 

मध्यंतरी शासनाने 20 पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संपूर्ण राज्यातून या निर्णयाला पहिला विरोध कोल्हापूर जिल्ह्याने केला. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी या प्रश्‍नात लक्ष घातले. त्यामुळे तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना कोल्हापुरात येवून याप्रश्‍नी चर्चा करावी लागली. त्यानंतर अधूनमधून अशा शाळा बंद होणार, अशी चर्चा होत राहिली. मात्र आजपर्यंत या शाळा काही बंद झाल्या नाहीत. वर्षातून काही वेळ अशा प्रकारची चर्चा होत राहते. महत्वाची बाब म्हणजे या 20 पटाच्या आतील सर्वाधिक शाळा या डोंगरी भागात आहेत. त्यामुळे पट कमी होण्याची कारणेही शोधणे गरजेचे आहे. 

शाहूवाडी तालुक्‍यात 20 पटाच्या आतील शाळांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 102 इतकी आहे. या तालुक्‍यात शिक्षकांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. या तालुक्‍यातून सर्वाधिक शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज येतात. तसेच या तालुक्‍यात जाण्यासही शिक्षक नकार देतात. कमी अधिक प्रमाणात डोंगरी तालुक्‍यात अशीच परिस्थिती आहे. याचा परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर व शाळा बंद पडण्यावर होतो. त्यामुळे या तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा, तेथील शिक्षकांच्या अडचणी काय आहेत, पालकांची भूमिका काय आहे, हे जाणून घेणे आवश्‍यक आहे. मात्र आत्तापर्यंत तरी असा प्रयत्न ना शिक्षण विभागाने केला ना जिल्हा परिषदेने. 

तालुकानिहाय 20 पटाच्या शाळा 

शाहूवाडी 102 
राधानगरी 70 
भुदरगड 57 
चंदगड 57 
आजरा 39 
पन्हाळा 37 
गडहिंग्लज 21 
गगनबावडा 27 
कागल 11 
करवीर 11 
शिरोळ 11 
हातकणंगले 5 
--------- 
एकूण 448 

कमी पटांच्या शाळेत वाढच... 
शाहूवाडी, राधानगरी, चंदगड, भुदरगड, आजरा, पन्हाळा या तालुक्‍यात सर्वाधिक कमी पटाच्या शाळा आहेत. 448 पैकी एकट्या शाहूवाडी तालुक्‍यात 102 शाळा आहेत. तर कमी पटाच्या सर्वात कमी शाळा या हातकणंगले तालुक्‍यात आहेत. येथे केवळ 5 शाळा असून यातील 2 शाळांचा पट 0 ते 10 तर 3 शाळांचा पट हा 11 ते 20 दरम्यान आहे. कमी पटांच्या शाळांची संख्या दरवर्षी वाढत आहे. 

20 पटांच्या आतील शाळांची संख्या लक्षणीय असून ही संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. या ज्या 20 पटाच्या आतील शाळा आहेत यांचा पट कमी का आहे, याची कारणे शोधली जाणार आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत या शाळा बंद होवू नयेत, या शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी जिल्हा परिषदेकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या शाळांचा पट वाढावा यासाठी नव्याने मोहिम घेण्यात येईल. 
- प्रवीण यादव, सभापती शिक्षण समिती. 


दृष्टिक्षेप
- डोंगरी भागात संख्या अधिक 
- शाहुवाडी तालुक्‍यात सर्वाधिक 102 शाळा 
- शिक्षकांची संख्याची अपुरी 
- नव्याने मोहिम घेतली जाणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com