कोरोना उपचारातील महत्त्वाच्या इंजेक्‍शनचा काळाबाजार रोखण्यासाठी कोल्हापूर प्रशासन सतर्क 

Kolhapur administration alerted to curb black market of remedial injection
Kolhapur administration alerted to curb black market of remedial injection

कोल्हापूर - कोरोना उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रेमडेसिव्हीयर इंजेक्‍शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्कता ठेवली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या परवानगीशिवाय हे इंजेक्शन मिळत नाही.

यासाठी संबंधित खासगी हॉस्पीटल मधील डॉक्‍टरांनासुद्धा परवानगी घ्यावी लागत आहे. अनेकांना ही अडचण वाटत असली तरीही प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आता खरोखरच अत्यावश्‍यक रुग्णांना हे इंजेक्‍शन मिळत आहे.

रेमेडिसिव्हीयर इंजेक्‍शन सध्या खासगी बाजारपेठेत कुठे ही मिळत नाही. केवळ शासकीय कोविड सेंटर मध्येच मिळेल असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हे इंजेक्‍शन मिळवण्यासाठी तीन खासगी डॉक्‍टरांपैकी एक डॉक्‍टर व जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांची मान्यता घ्यावी लागत आहे. इंजेक्‍शनचा काळाबाजार रोखण्यासाठीच प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. 

आज सीपीआर मध्येतब्बल दीड हजारांहून अधिक इंजेक्‍शन उपलब्ध असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोरोनाबाधित असलेल्या रूग्णाला तीव्र श्‍वसनाचा त्रास होत असेल तर त्याला तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार रेमडेसिव्हीयर हे इंजेक्‍शन घ्यावे लागते. त्यासाठी खासगी रूग्णालयात रूग्ण दाखल असेल तर तेथील डॉक्‍टर इंजेक्‍शनची चिठ्ठी लिहून देतात. ही चिठ्ठी घेऊन शहरातील तीन मोठ्या खासगी दवाखान्यातील डॉक्‍टरांपैकी एका डॉक्‍टरची सही आणावी लागते. त्यानंतर जिल्हा परीषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही आणावी लागते. ही प्रक्रीया किचकट असली तरीही अत्यावश्‍यक रुग्णांनाच ते मिळावे,अशी भूमिका जिल्हा प्रशासनाची आहे.

एका कंपनीचे रेमडेसिव्हीयर इंजेक्‍शन पाच हजार १०० रुपयांना, तर दुसऱ्या कंपनीचे इंजेक्‍शन चार हजार रुपयांना मिळते. अर्थात, हे फक्त शासन प्रमाणित रुग्णालयांत उपलब्ध होऊ शकते. हे इंजेक्‍शन खासगी औषध दुकानांत मिळत नाही. त्यामुळे ज्या रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार मिळतात, तेथील डॉक्‍टरांनी या इंजेक्‍शनची पुरेशी मागणी नोंदविणे अपेक्षित आहे.’’  
-मदन पाटील, अध्यक्ष, जिल्हा केमिस्ट असोसिएशन

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com