करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत

kolhapur ambabai temple Department of Archeology
kolhapur ambabai temple Department of Archeology

कोल्हापूर  : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची कोणतीही झीज झालेली नसून ती सुस्थितीत आहे; मात्र मंदिरातील श्री महासरस्वती आणि महाकाली देवीच्या मूर्तींवर रासायनिक प्रक्रिया करणे आवश्‍यक असल्याचे आज पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले. दरम्यान, मंदिरावरील धोकादायक काँक्रिटचा थर काढण्याबरोबरच इतर विकासकामांसाठी आवश्‍यक परवानगीसाठी प्रस्ताव पाठवा. अभ्यास करूनच निर्णय दिला जाईल, असेही त्यांनी देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

श्री अंबाबाईच्या मूर्तीवर २५ जुलै २०१५ ला रासायनिक प्रक्रिया झाली. त्यानंतर जून २०१७ मध्ये पुरातत्त्व विभागातर्फे पाहणी झाली आणि त्यानंतर आज पुन्हा मूर्तीसह इतर कामांचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. श्रीकांत मिश्रा यांच्यासह सुधीर वाघ, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, उपअधीक्षक उत्तम कांबळे आदींचा त्यात समावेश होता. 
सुरवातीला अंबाबाईच्या मूर्तीची आणि त्यानंतर महाकाली व महासरस्वतीच्या मूर्तींची पाहणी झाली. मंदिरात मोठ्या प्रमाणात कार्बनचा थर चढला असून ठिकठिकाणी दगड निखळले आहेत. 
 
वायरिंग, तारा दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे विलास वहाने यांनी सांगितले. मंदिरावरील काँक्रिटचा थर काढण्याचे काम अवघड व जोखमीचे असून आणखी योग्य तो अभ्यास करूनच प्रस्ताव पाठवा. मनकर्णिका कुंडाच्या खोदाईचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देवस्थान समितीला करण्यात आल्या.

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, हेरिटेज समितीच्या अमरजा निंबाळकर, उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर, गणेश नेर्लेकर आदी यावेळी उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com