कोल्हापुरातील उद्याने बनलीत, गवताची कुरण 

Kolhapur became a garden, a meadow
Kolhapur became a garden, a meadow

कोल्हापूर  : शहरातील महापालिका उद्यानांची अवस्था सध्या बकाल झाली आहे. उद्यान विभागाकडील कर्मचारी कोविडच्या कामी व्यस्त असल्याने भांगल, तण काढणे अशी कामे ठप्प झाली आहेत. 

कोरोनामुळे 22 मार्चपासून उद्याने पूर्णपणे बंद आहेत. गर्दी टाळण्यासाठी उद्याने बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढल्याने पुन्हा पावसाळा संपल्यानंतर ती खुली होण्याची शक्‍यता आहे. पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उद्यानांची दरवर्षी देखभाल दुरुस्ती होते. तण काढण्यापासून ते भांगलण, तसेच झाडांचे कटिंग केले जाते. तीन महिन्यांपासून या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने उद्यानात आता गुडघाभर तण उगवले आहे. उद्यानांचे दरवाजे बंद असल्याने लोकांचे ये-जा करणे पूर्णपणे बंद आहे. 

कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत उद्यान विभागाकडील कर्मचाऱ्यांना ड्यूटी लावली गेली. संबंधित कर्मचारी सोडून अन्य कर्मचारी उद्यानात उपस्थित होते, त्यांच्याकडून काम होणे अपेक्षित होते. रंकाळा चौपाटी, रंकाळा पदपथ उद्यान, पद्माराजे उद्यान, हुतात्मा पार्क, महावीर उद्यान, नाना-नानी पार्क, मुक्त सैनिक, रूईकर कॉलनी आदी उद्याने मोकळा श्‍वास घेण्याची ठिकाणे आहेत. उद्यानात गवताची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने त्यात सापांचा धोका अधिक आहे. लॉकडाउनच्या काळात लोकांची वर्दळ नसल्याने देखभाल दुरुस्तीची कामे करण्याची खऱ्या अर्थाने संधी होती. ती गमावल्याने पावसाळ्यात उद्यान खुलून दिसण्यापेक्षा तेथे तणच अधिक वाढले आहे. असून सापांचा वापरही दिसून येत आहे. 

रंकाळ्याच्या पिछाडीस असलेल्या उद्यानात तण वाढले आहे. त्यात एखादा साप लपून बसू शकतो. एखाद्या मुलाला त्याचा दंश झाल्यास ते केवढ्याला पडेल? तण काढणे, भांगलण, झाडांच्या फांद्या छाटणे, अशी कामे होणे अपेक्षित होते. मात्र, ती झालेली नाहीत. या दिवसात उद्याने खुलून दिसायला हवी होती. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. 
- अशोक देसाई, संस्थापक अध्यक्ष, हिंदू युवा प्रतिष्ठान 

कोरोनाच्या काळात पुरुष कर्मचाऱ्यांना ड्यूटी लावली. ज्या उद्यानात तण वाढले आहे, ती सुस्थितीत करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल. त्या दृष्टीने संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील. 
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता 

दृष्टिक्षेप 
- कोरोनामुळे शहरातील सर्व उद्याने बंद 
- भांगलण, झाडांचे कटिंग, तण काढण्याकडे दुर्लक्ष 
- उद्यान विभागाचे कर्मचारी कोरोना कामात 
- उद्यानांमध्ये सापांच्या वावर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com